‘अध्यात्माच्या प्रचाराची सेवा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नेहमीच सूक्ष्मातून समवेत असतात’, याची साधिकेला येत असलेली प्रचीती !

त्या वसाहतीत प्रवचने झाल्यामुळे तेथील लोकांना नामजपाची गोडी लागली. ते सर्व जण सामूहिक नामजप करतात. त्या वसाहतीतील जिज्ञासू नामजप करत असल्यामुळे त्यांना अनुभूती येऊ लागल्या. 

सेवाभाव असणारे इचलकरंजी येथील श्री. सदाशिव जाधव (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८९ वर्षे) !

‘काका वेळेचे पालन करतात. ते अतिशय शिस्तप्रिय आहेत. काकांची व्यष्टी साधना कधीही खंडित होत नाही. सध्या ते ५ ते ६ घंटे नामजप करतात.’

प.पू. भक्तराज महाराज अन् त्यांचे शिष्य डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची मुंबई येथील चि. जश्रीता मंजुनाथ पुजारी (वय २ वर्षे) !

जश्रीता एक मासाची असतांना आम्ही भ्रमणभाषवर लावलेला श्रीकृष्णाचा पाळणा आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी गायलेले ‘तुम्ही राम हो तुम्ही कृष्ण हो’, हे गीत तिला फार आवडत असे.

पू. अशोक पात्रीकर यांच्या सत्संगात साधिका करत असलेल्या नामजपात पालट होऊन तिचा ‘परम पूज्य’, असा नामजप आपोआप होऊ लागणे आणि आनंदाची अनुभूती येणे

सनातनचे संत पू. अशोक पात्रीकरकाका, मी आणि चालक-साधक एका जिज्ञासूला भेटण्यासाठी जात होतो. त्या वेळी मी ‘ॐ ॐ श्री दुर्गादेव्यै नमः ॐ ॐ ।’, हा नामजप करत होते. गाडीत पुष्कळ ऊन आल्याने पू. काका मागे येऊन शेजारी येऊन बसल्यावर माझ्या नामजपात आपोआप पालट होऊन माझा ‘परम पूज्य, परम पूज्य’, असा नामजप होऊ लागला…

म्हातारपणी देवाचे नाव आठवण्यासाठी तरुणपणातच नामस्मरणाचा संस्कार मनावर करणे आवश्यक असणे 

‘म्हातारपणी विस्मरणामुळे काहीच आठवत नाही. त्यामुळे त्या वेळी देवाचे नाव तरी कसे आठवणार ? यासाठी नामस्मरणाचा संस्कार मनावर होण्यासाठी तरुणपणापासूनच अधिकाधिक नामस्मरण करावे. जेणेकरून म्हातारपणी देवाचे नामस्मरण करणे सुलभ होईल.’ 

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना साधिकेला आलेली अनुभूती

३ ते ७.२.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी आले होते. त्या वेळी ध्यानमंदिरात नामजप करतांना मला आलेली अनुभूती येथे दिली आहे. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा आणि सात्त्विक गोष्टींची आवड असलेला फोंडा (गोवा) येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. श्रीहरि विवेक चौधरी (वय ५ वर्षे) !

‘श्रीहरीला ‘सूर्याला अर्घ्य देणे, तुळशीला पाणी घालणे आणि देवपूजा करणे’, या कृती पुष्कळ आवडतात. त्याला रांगोळी काढायला आवडते आणि ‘आई कशी रांगोळी काढते ?’, ते पाहून तोसुद्धा रांगोळीमध्ये रंग भरतो.’

निरपेक्ष प्रेम करणार्‍या आणि समष्टी सेवेची तळमळ असणार्‍या पू. (सौ.) मनीषा पाठक !

‘जिथे साधना सांगण्याची संधी मिळेल, तिथे साधना सांगायची आणि गुरूंनी सांगितलेली साधना सर्वांपर्यंत पोचवायची’, हे मला पू. ताईंकडून शिकायला मिळाले.

 पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी (वय ८७ वर्षे) साधकांसाठी नामजप करत असतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे !

‘साधकांनी योग्य प्रकारे आवरण काढण्यास आरंभ केल्यावर वातावरणातील त्रासदायक शक्ती जलद गतीने दूर होत आहे’, असे मला जाणवले.

साधकांनो, अपघातांपासून रक्षण होण्यासाठी प्रतिदिन नामजपादी उपाय करा !

विविध प्रकारच्या अपघातांपासून रक्षण होण्यासाठी साधकांनी उपास्य देवतेला प्रार्थना करावी आणि वैयक्तिक नामजपासह पुढील नामजप करावा.