‘अध्यात्माच्या प्रचाराची सेवा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नेहमीच सूक्ष्मातून समवेत असतात’, याची साधिकेला येत असलेली प्रचीती !

‘ईश्वरपूर (सांगली) येथे वर्ष २०२४ मधील श्रावण मासात हनुमान मंदिरात ग्रंथप्रदर्शनाची सेवा होती. या वेळी आमचा सौ. उज्ज्वला हणमंत जाधव यांच्याशी संपर्क झाला. आम्ही त्यांना साधना आणि नामजपादी उपाय यांविषयी सांगितले. त्यांनी लगेच साधना चालू केली. आम्ही त्यांना जे सांगितले, ते त्यांनी कृतीत आणले. त्यांना अनुभूती आल्या. त्यांच्यात साधनेची तळमळ आणि देवाप्रती भाव पुष्कळ आहे.

त्या रहात असलेल्या वसाहतीत आम्ही प्रवचन करण्याचे नियोजन केले. आम्ही त्या वसाहतीत घरोघरी जाऊन लोकांना प्रवचनाचे निमंत्रण दिले. तेव्हा ‘त्या वसाहतीत पुष्कळ आध्यात्मिक त्रास आहे’, असे आम्हाला जाणवले.

त्यानंतर त्या वसाहतीत २ प्रवचने झाली. प्रत्येक प्रवचनाच्या वेळी २५ ते ३० जण उपस्थित होते. त्या वसाहतीत प्रवचने झाल्यामुळे तेथील लोकांना नामजपाची गोडी लागली. ते सर्व जण सामूहिक नामजप करतात. त्या वसाहतीतील जिज्ञासू नामजप करत असल्यामुळे त्यांना अनुभूती येऊ लागल्या.

गुरुकृपेमुळेच असे अनुभवता येत आहे. ‘अध्यात्माच्या प्रचाराची सेवा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नेहमीच सूक्ष्मातून समवेत असतात’, याची मला जाणीव होते.

गुरुदेवांच्या चरणी संपूर्ण शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. समिधा खोत, ईश्वरपूर, सांगली. (३.३.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.