सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्‍यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्‍त्राचे महत्त्व पाश्‍चात्त्यांना समजले आहे; म्‍हणून ते आयुर्वेदाच्‍या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘अ‍ॅलोपॅथी’त नव्‍हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्‍ट करण्‍याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

रात्रीचे जागरण टाळून सकाळी लवकर उठण्‍याची सवय लावावी !

एकाएकी झोपेच्‍या वेळांमध्‍ये पालट केल्‍याने काही वेळा ‘झोप पूर्ण झाली नाही’, असे होऊ शकते. त्‍यामुळे एकाएकी पालट न करता झोपेची वेळ टप्‍प्‍याटप्‍प्‍याने अलीकडे आणावी.’

आज धुळे येथे चौकाचे ‘वैद्यराज कै. प्रभाकर जोशी (नाना) चौक’ असे नामकरण होणार !

‘पंचकर्म उपचार’ गरीब रुग्णाला परवडेल अशा पद्धतीने या चिकित्सेचा प्रसार नानांनी केला. सहस्रो रुग्णांना पंचकर्माच्या साहाय्याने व्याधीमुक्त करणार्‍या या वटवृक्षाने अनेक शिष्य निर्माण करून ही परंपरा अखंड तेवत ठेवली.

आहार-विहारातील चुकीच्या सवयी सोडण्याचे महत्त्व

वारंवार खाण्याची सवय लागली असेल, तर ती हळूहळू सोडावी आणि आयुर्वेदाचा गाभा असलेल्या ‘दिवसातून २ वेळाच आहार घेणे आणि सकाळी स्वतःच्या क्षमतेनुसार भरपूर व्यायाम करणे’, या दोन चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात.’

‘तोंड येणे’ यावर घरगुती उपचार

‘जाई, आंबा, औदुंबर आणि पेरू यांपैकी कोणत्याही एका झाडाची १ – २ पाने दिवसातून ३ – ४ वेळा चावून चावून २ मिनिटे तोंडात धरून मग थुंकावीत. एका दिवसात गुण येतो.

प्रतिदिन दातांची काळजी घ्यावी !

‘एवढ्याशा दातांवरील उपचार किती खर्चिक आणि वेदनादायी असतात’, हे जेव्हा दंतवैद्यांकडे जावे लागते, तेव्हा समजते. ‘ती वेळ आपल्यावर येऊ नये’, यासाठी काय करावे . . . ?

व्यायाम करायला वेळ मिळत नाही ?

इथे दिलेल्या गोष्टीमध्ये कुर्‍हाडीला धार काढण्याचे जे महत्त्व, तेच प्रतिदिन व्यायाम करण्याचे आहे. यातून बोध घेऊन नियमित व्यायाम करावा. ‘लाकूडतोड्या’ पुनःपुन्हा हे सांगायला येणार नाही’, हे लक्षात घ्यावे.’

घरच्या घरी करा ‘सुवर्णप्राशन’ !

आजकाल पुष्कळ ठिकाणी लहान मुलांना प्रत्येक मासात पुष्य नक्षत्रावर ‘सुवर्णप्राशन’ केले जाते. ‘सुवर्ण’ म्हणजे ‘सोने’. यापासून बनवलेले औषध या दिवशी लहान मुलांना देतात.