रात्रीची झोप पूर्ण होणे आवश्‍यक

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १५२

संग्रहित चित्र
वैद्य मेघराज पराडकर

‘दिवसभरात शरिराची जी झीज होते, ती रात्रीच्‍या झोपेने भरून येत असते. त्‍यामुळे रात्री सलग आणि पुरेशी झोप घेणे आवश्‍यक असते. काही जण रात्री उशिरापर्यंत जागतात आणि पहाटे पुन्‍हा लवकर उठतात. त्‍यामुळे त्‍यांची झोप पूर्ण होत नाही. मग ते दिवसभरात अधेमधे झोपतात. असे कधीतरी घडले, तर काही अपाय होत नाही; परंतु नियमित असे करत गेल्‍यास त्‍याचे शरिरावर अनिष्‍ट परिणाम दिसू लागतात. तसे होऊ नये, यासाठी प्रतिदिन पुरेशी झोप सलग घ्‍यावी.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.२.२०२३)

लेखमालिका आचरणात आणून झालेले लाभ कळवा !
[email protected]