भगवंताने दिलेले शरीर अमूल्‍य आहे, याची जाणीव ठेवून ते निरोगी ठेवण्‍यासाठी प्रयत्न करावेत !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १४७

वैद्य मेघराज पराडकर

‘तुम्‍हाला कुणी सांगितले की, ‘तुमचे दोन्‍ही हात कापून द्या. तुम्‍हाला २ कोटी रुपये देतो’, तर तुम्‍ही तसे कराल का ? अजून कुणी सांगितले की, ‘तुमचे दोन्‍ही पाय कापून द्या. तुम्‍हाला अजून २ कोटी रुपये देतो’, तर तुम्‍ही द्याल का ? दोनच का, ‘१० कोटी रुपये देतो’, असे सांगितले, तरी तुम्‍ही तसे करणार नाही. आपल्‍या शरिराची पैशांमध्‍ये किंमत करता येणेच शक्‍य नाही. एवढे अमूल्‍य शरीर देवाने आपल्‍याला विनामूल्‍य दिले आहे, याविषयी सतत कृतज्ञता मनात ठेवून आपण शरीर निरोगी ठेवण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत.

पुढील प्रयत्न नियमित करावेत – 

१. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे.
२. प्रतिदिन सकाळी न्‍यूनतम अर्धा घंटा व्‍यायाम करावा.
३. चांगली भूक लागल्‍यावरच आहार घ्‍यावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२३)

लेखमालिका आचरणात आणल्‍याने झालेले लाभ कळवा !
[email protected]