निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १४८
‘विविध प्रसाधने, खाद्यपदार्थ इत्यादींमध्ये वापरल्या जाणार्या कृत्रिम रसायनांचे शरिरावर विषासारखे परिणाम होतात, तसेच यांच्यामुळे कर्करोगासारखे गंभीर विकारही वाढतात’, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. ‘आपल्या मनात असूनही आपण कृत्रिम रसायनांच्या वापरापासून स्वतःला वेगळे ठेवू शकत नाही’, अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. असे असले, तरी जिथे शक्य आहे, तिथे आपण हानीकारक रसायनांचा वापर टाळायला हवा. यासाठी दिवसाचा आरंभ टूथपेस्टने करण्यापेक्षा आयुर्वेदिक दंतमंजनाने करावा. सनातनचे आयुर्वेदिक दंतमंजन उपलब्ध आहे.’
सनातन दंतमंजनाचे महत्त्व
‘सनातन दंतमंजनामध्ये बकुळसाल, हिरडा, बेहडा, तुरटी यांसारखी औषधी चूर्णे आहेत. या चूर्णांमधील औषधी गुणधर्मामुळे दात, तसेच हिरड्या यांच्यातील विकार दूर होण्यास साहाय्य होते. प्रतिदिन सकाळी उठल्यावर, तसेच रात्री झोपण्यापूर्वी दंतमंजनाने दात घासल्याने तोंडातील विकृत कफ दूर होतो, तसेच दातांना बळकटी येते. दात किडणे थांबून दातांचे आरोग्य सुधारते. दंतमंजनाच्या नियमित वापराने हिरड्या सुजणे, त्यांतून पू किंवा रक्त येणे, हे त्रास दूर झाल्याचे अनेकांनी अनुभवले आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२३)
दंतमंजन वापरा आणि त्याचे लाभ कळवा !
ई-मेल पत्ता : [email protected]