निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १५०
‘दुपारी जेवून अधिक वेळ झोपल्यास शरिराचा रक्तप्रवाह हातापायांकडे अधिक प्रमाणात वळतो आणि पोटाकडे जाणारा रक्तप्रवाह काही अंशी न्यून होतो. त्यामुळे अन्नपचन नीट होत नाही. अन्नपचन नीट न झाल्यास विविध विकार होऊ शकतात. तसे होऊ नये, यासाठी ज्यांना दुपारी जेवल्यावर झोपण्याची सवय आहे, त्यांनी दुपारी अधिकाधिक अर्धा घंटा झोप घ्यावी. असे केल्याने जेवून झोपल्याचे दुष्परिणाम न होता शरिराला आवश्यक तेवढी विश्रांती मिळते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२३)
दुपारची झोप न्यून करून तुम्हाला झालेले लाभ कळवा !
ई-मेल पत्ता : [email protected]