६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्वाती शिंदे यांना बालसंत पू. वामन राजंदेकर यांच्या संदर्भात आलेली अनुभूती !

पू. वामन मला (मनातूनच) सांगत होते, ‘अगं, संतांना स्थुलाचे बंधन नसते. एखाद्याच्या मनातील भाव, तळमळ जाणून ते ती कसेही करून पूर्ण करतात.’’ त्यामुळे ‘स्थुलातून मी तिकडे येण्याची आवश्यकता नाही. मी सूक्ष्मातून तुझी इच्छा पूर्ण केली आहे.

सनातनच्या रामनाथी आश्रमात आल्यावर विविध यज्ञ आणि याग यांच्या वेळी उपायांसाठी बसल्यावर आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात यज्ञ याग यांना नामजपादी उपायांना बसण्याची संधी मिळते. तेव्हा परात्पर गुरुमाऊलीप्रती अपार कृतज्ञता वाटून मन भरून येते. गुरुमाऊली या यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी देत आहेत, यासाठी ‘कृतज्ञता’ हा शब्दसुद्धा अपुरा आहे.

गुरुमाऊली, तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो ।

प्रत्येक साधकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ।
गुरुमाऊली, कितीही जन्म घेतले, तरी गुरुऋण कसे फेडू आपले ॥

रामनाथी आश्रमातील श्री. चेतन हरिहर यांना साधनेविषयी सुचलेली काही सूत्रे

हृदयात गुरुदेवांना विराजमान करायचे असेल, तर हृदयाची स्वच्छता करणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे. अंतःकरणाची शुद्धी केल्यानंतरच गुरुदेव हृदयरूपी मनमंदिरात विराजमान होतात.’

कु. नंदा नाईक यांना यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती

६.५.२०१८ या दिवशीच्या  यज्ञाला मी आश्रमात उपस्थित होते. तेव्हा मला यज्ञातून एक देवी बाहेर येतांना दिसली. तो यज्ञ श्री मातंगीदेवीचा होता. मातंगीदेवीला पोपटी रंग आवडतो आणि यज्ञातून बाहेर आलेल्या देवीच्या साडीचा रंगही पोपटी होता.

प.पू. भक्तराज महाराज रचित भजने ऐकतांना अनुभवलेली भावावस्था आणि रात्री नामजप होत असल्याने मिळत असलेला आनंद

कार्तिक कृष्ण पक्ष नवमी (९.१२.२०२०) या दिवशी असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाण उत्सवाच्या निमित्ताने…

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

ग्रहदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांच्या निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात जप, दान, शांती, रत्न धारण करणे इत्यादी उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने दुष्परिणामांची तीव्रता काही प्रमाणात न्यून होण्यास साहाय्य होते; परंतु हे उपाय तत्कालीक परिणाम करतात.

चि. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड एक अद्वितीय वर अन् वधू !

​आज कार्तिक कृष्ण पक्ष नवमी रोजी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांच्या शुभविवाहानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले आणि कु. स्वाती यांच्यामधील काव्यमय संभाषण येथे देत आहोत.

तत्त्वनिष्ठ आणि गुरूंवर दृढ श्रद्धा असणारे श्री. संदीप शिंदे अन् गुरूंप्रती अपार भाव असणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड !

रामनाथी आश्रमातील पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे अन् चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांच्या शुभविवाहानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये …

साधकांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणार्‍या आणि आनंदी असणार्‍या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड !

ती एकदा परात्पर गुरुदेवांविषयी बोलायला लागली की, तो एक भाववृद्धी सत्संगच होऊन जातो. तेव्हा ती स्वतःच्या समवेत अन्य साधकांनाही भावस्थितीत घेऊन जाते. ती ते सांगत असतांना आपल्याला ते भावक्षण प्रत्यक्ष अनुभवत असल्याचीच अनुभूती येते.