सनातनच्या रामनाथी आश्रमात आल्यावर विविध यज्ञ आणि याग यांच्या वेळी उपायांसाठी बसल्यावर आलेल्या अनुभूती
रामनाथी आश्रमात यज्ञ याग यांना नामजपादी उपायांना बसण्याची संधी मिळते. तेव्हा परात्पर गुरुमाऊलीप्रती अपार कृतज्ञता वाटून मन भरून येते. गुरुमाऊली या यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी देत आहेत, यासाठी ‘कृतज्ञता’ हा शब्दसुद्धा अपुरा आहे.