कोरोनाच्या काळात अंबरनाथ-बदलापूर विभागातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे रुग्णांना साहाय्य !

कठीण प्रसंगात रुग्णसेवा करून त्यांना आधार देणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे अभिनंदन ! यांचा आदर्श अन्य समाजसेवी संघटनांनीही घ्यावा !

कोल्हापूर शहरातील कोरोना केंद्रात रुग्णांना विनामूल्य उपचार !

गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांना १२ कोरोना केंद्रात भोजन, औषध आणि वैद्यकीय सेवा विनामूल्य दिली जात आहे.

कोल्हापूर शहरातील घरपोच भाजीपाला नियोजन कोलमडले

महापालिकेने घरपोच भाजीपाला देण्यासाठी केलेले नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. पहिले २ दिवस शहरातील काही भागात भाजी विक्रेते भाजी घेऊन येत होते.

नातेवाइकांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण हा स्तुत्य उपक्रम ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज

मनुष्य शरीराने जातो; मात्र त्यांच्या स्मृती रहातात. स्मृतीप्रित्यर्थ कुटुंबियांनी राबवलेला वृक्षारोपण उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.

सोलापूर महापालिकेच्या १५ आरोग्य केंद्रांमध्ये चालू करणार ‘औषध बँक’ !

रुग्णांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सोलापूर महापालिकेने स्तुत्य निर्णय घेतला असून अन्य महापालिकांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घ्यावा !

किशोर घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आशा वर्कर, कर्मचारी यांना ‘ऑक्सिमीटर’, ‘हॅन्डग्लोज’, तसेच अन्य साहित्य प्रदान !

किशोर घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंचगंगा लसीकरण केंद्र येथील आशा वर्कर, कर्मचारी यांना ‘ऑक्सिमीटर’, ‘हॅन्डग्लोज’ आणि ‘मास्क’ प्रदान करण्यात आले.

देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन बस’चे बेळगाव (कर्नाटक) येथे उद्घाटन

देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन बस’चे बेळगावचे जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उद्घाटन करण्यात आले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जयंती साजरी

संपूर्ण महाराष्ट्रासह हे जग कोरोनामुक्त व्हावे, यासाठी महामृत्यूंजय जपाची सामूहिक आवर्तने करण्यात आली.

सांगली येथे आमदार सुधीर गाडगीळ युवा मंच संचालित पंडित दीनदयाळ कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

भाजपच्या वतीने आमदार श्री. सुधीर गाडगीळ युवा मंच संचालित पंडित दीनदयाळ कोविड केअर सेंटरचे उद्घाटन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.

लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा पुणे महानगरपालिकेचा निर्णय

लहान मुलांसाठी अद्ययावत सुविधांचे ‘चाइल्ड केअर सेंटर’ येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात चालू करत आहे.