वैद्यकीय व्यवसाय नीतीने करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे लासलगाव (जिल्हा नाशिक) येथील कै. आधुनिक वैद्य सुशील मनोहर कुलकर्णी (वय ६४ वर्षे)!
आधुनिक वैद्य सुशील कुलकर्णी यांनी वैद्यकीय पेशाकडे व्यवसाय म्हणून कधी पाहिले नाही. एवढ्या महागाईच्या काळातही ते रुग्णांकडून अल्प प्रमाणात ‘फी’ घेत असत. त्यांनी दिलेल्या औषधाने रुग्णांना त्वरित गुण येत असे.’