उत्साही आणि आनंदी असणार्‍या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती दाते (वय ६० वर्षे) !

‘सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांची सेवा करतांना फोंडा, गोवा येथील सौ. सीमा सामंत यांना पू. दातेआजी यांची मोठी सून सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. ज्‍योती दाते

१. प्रेमभाव

अ. मी ‘पू. (श्रीमती) दातेआजी यांची सेवा करण्यासाठी गेल्या ४ – ५ मासांपासून त्यांच्या खोलीत जाते. त्या वेळी सौ. ज्योती दाते यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळते. कधी कधी मला बरे नसते, तेव्हा त्या प्रत्येक वेळी माझी आपुलकीने विचारपूस करतात.

सौ. सीमा सामंत

आ. एकदा मी आश्रमातील मार्गिकेमध्ये चालतांना पाय घसरून पडले. त्यामुळे ‘पू. दातेआजींच्या सेवेला जाऊ शकले नाही’, हे कळल्यावर ज्योतीकाकू व्यस्त असतानांही मला पहाण्यासाठी माझ्या खोलीत आल्या. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही विश्रांती घ्या. सेवेला येऊ नका.’’ त्या वेळी मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२. उत्साही आणि आनंदी

सौ. ज्योतीकाकू पू. आजींची सेवा करून उर्वरित वेळेत सेवा करतात, तरी त्यांच्या चेहर्‍यावर कधीच थकवा आलेला जाणवत नाही. त्या सतत उत्साही आणि आनंदी असतात. त्यांच्याकडे पाहून मलाही सेवा करायला उत्साह येतो.

३. चांगली निर्णयक्षमता

कधी पू. आजींची सेवा करतांना त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. त्या वेळी सौ. ज्योतीकाकू पटकन निर्णय घेतात आणि ती अडचण सुटते.

४. परिस्थिती स्वीकारणे

कधी पू. आजींची सेवा करतांना काही अडचण आली किंवा सेवेला अल्प-अधिक जण असले, तर सौ. ज्योतीकाकू लगेच परिस्थिती स्वीकारतात. त्यावर उपाय सुचवतात आणि ती अडचण सोडवतात.

५. पू. दातेआजींप्रतीचा भाव

सौ. ज्योतीकाकू पू. आजींची सेवा पुष्कळ भावपूर्ण करतात. त्या प्रत्येक कृती करतांना पू. आजींना सांगून ती कृती करतात. रुग्णाईत असलेल्या ‘पू. आजीही त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देतात’, असे मला जाणवते.

‘पू. आजी आणि सौ. ज्योतीकाकू यांचे वेगळेच नाते आहे’, असे मला जाणवते आणि माझी भावजागृती होते.

प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला पू. दातेआजींची सेवा करण्याची संधी मिळत आहे. तसेच सौ. ज्योतीकाकू यांचे गुण लिहून घेतल्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सीमा सामंत, फोंडा, गोवा. (६.१२.२०२४)