फोंडा (गोवा) येथील श्रीमती अनिता कोनेकर यांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने मला काही दिवसांपासून एक वेगळीच अनुभूती येत आहे. मी रात्री अंथरुणावर झोपते, त्या वेळी डोळे बंद असलेल्या स्थितीत मला असे जाणवते, ‘माझ्या डाव्या डोळ्याकडून पांढर्‍या रंगाच्या प्रकाशाचा एक गोळा येतो आणि उजव्या डोळ्याकडे जातो. त्याच्या मागोमाग तसेच ४ – ५ गोळे येतात. ते येऊन गेल्यावर ‘मला कधी झोप लागते ?’, हे माझे मलाच कळत नाही. कधी कधी ते गोळे माझ्या दोन्ही डोळ्यांभोवती फिरतात आणि मला नकळत झोप लागते. असे लागोपाठ ३ – ४ दिवस दिसते आणि नंतर थांबते. पुन्हा १५ दिवसांनी मला तसेच दिसू लागते. अशी एक वेगळीच अनुभूती गुरुदेवांनी मला अनुभवायला दिली, यासाठी मी कृतज्ञ आहे.’

– श्रीमती अनिता (माई) कोनेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७३ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (१४.७.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक