मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळा !

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना बी.एल्.ओ. (BLO) कामातून (निवडणुकीशी संबंधित कामे) वगळून अन्य कर्मचार्‍यांना ते देण्याविषयीचे स्पष्ट आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत.

१७ वर्षांपासून बेकायदेशीरपणे मुंबईत रहाणार्‍या अफगाणी नागरिकाला अटक !

वडाळा येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारा अफगाणी नागरिक हबीबुल्लाह प्रांग उपाख्य जहीर अली खान याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १० ते १२ वर्षांचा मुलगा दगड फोडतांना आढळला !; गुटखा तस्कराकडून ४ लाखांची रक्कम जप्त; पण पोलीस तोतया असल्याचे उघड !…

भारतीय राज्यघटनेनुसार १४ वर्षांखालील मुला-मुलींना अल्प आर्थिक मोबदला देण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून त्यांचा शैक्षणिक अधिकार हिसकावून त्यांना सामाजिक, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे हा कायद्याने गुन्हा असून यामध्ये कायद्यानुसार शिक्षेचे प्रावधान आहे.

मुळशी धरणाची उंची वाढवावी ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुळशी धरणाखालील गावांसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पी.एम्.आर्.डी.ए.) क्षेत्रातील पश्चिम भागात वाढणार्‍या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने मुळशी धरणाची उंची वाढवावी, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

जिल्ह्यातील ‘ड्रग्ज माफियां’ ची पाळेमुळे खणून कठोर कारवाई करा ! – भाजप

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कुपवाड येथे पुणे आणि सांगली पोलिसांनी कारवाई करत ३०० कोटी रुपयांचे १४० किलो अमली पदार्थ जप्त केले.

व्यायामशाळेत उत्तेजक द्रव्यांची विक्री करणार्‍या दोघांना अटक; ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त !

राज्यात सध्या ठिकठिकाणी अमली पदार्थ-उत्तेजक द्रव्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे आणि राज्यातील तरुण पिढी त्यात उद्ध्वस्त होत आहे. तरी सरकारने कठोरपणे कारवाई करून याची पाळेमुळे खणून काढावीत !

बनावट विज्ञापने करणार्‍या शिकवणीवर्गांवर कारवाई !

शिकवणीवर्गाविषयी बनावट विज्ञापने केल्यास शिकवणी वर्गचालकांवर कारवाई केली जाणार आहे. विज्ञापनांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिक १६ मार्चपर्यंत सूचना आणि हरकती पाठवू शकतात.

धर्माला धारण करणारा राम म्हणजेच धर्म आणि धर्म म्हणजेच राम ! – धीरज राऊत, हिंदु जनजागृती समिती, अकोला

आद्यशंकराचार्य यांनी धर्माची व्याख्या करतांना म्हटले आहे की, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होणे, तसेच समाजव्यवस्था उत्तम राखणे या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ म्हणतात.

दीड सहस्रांहून अधिक नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपचे उपाध्यक्ष शैलेश पाटील यांच्या पुढाकारातून २० आणि २१ फेब्रुवारीला शाहूपुरी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

अमळनेर येथे २५ फेब्रुवारीला विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर !

जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि नाशिक येथील एच्.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.