मुख्य निवडणूक अधिकार्यांचे आदेश
मुंबई – प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना बी.एल्.ओ. (BLO) कामातून (निवडणुकीशी संबंधित कामे) वगळून अन्य कर्मचार्यांना ते देण्याविषयीचे स्पष्ट आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. या संदर्भातील माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिली. ‘अशा कामांसाठी नियमित कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना घेतल्यास शाळा चालवणे अवघड जाईल, तसेच प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना निवडणूक कामातून वगळावे’, अशी मागणी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती संघटनेने मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना केली होती. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकार्यांनी पत्र पाठवून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना त्या कामातून वगळण्याचे आदेश दिले आहेत.