मायेपासून निवारण करण्यासाठी भगवंताला शरण जाणे महत्त्वाचे !

हे प्रभु, तुझी ही माया तुझ्या दृष्टीरूपी अंगणात नृत्य करत आहे अन् काल, स्वभाव यांद्वारे सत्त्व-रज-तमोगुणी भाव दर्शवत आहे. ती माझ्या मस्तकावर चढून आतुर असल्याप्रमाणे माझे मर्दन करत आहे. हे नृसिंहा, मी तुला शरण आलो आहे. तूच मायेचे निवारण कर.

भारताची प्रगती थांबवण्यासाठी चीनकडून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची निवड !

भारताच्या विरोधात घरभेदींकडून आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात रचली जाणारी षड्यंत्रे सरकारने वेळीच उधळून लावावीत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे तीव्र प्रारब्धावर मात केलेले वाराणसी आश्रमातील श्री. संजय सिंह !    

वर्ष २००० पासून मी पूर्णवेळ साधना करू लागलो. या कालावधीत मला कसलाही त्रास झाला नाही. त्यामुळे मी या आजाराकडे लक्ष दिले नाही.

सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्या खोलीतील वस्तू आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्यात जाणवलेले पालट

श्री दुर्गादेवीच्या चित्रातील तिच्या साडीचा रंग प्रथम गडद लाल होता. तोही आता फिकट झाला आहे. ‘तिच्या मुखाच्या सभोवती असणारी पांढर्‍या रंगाची प्रभावळ वाढत आहे’, असे जाणवते.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे भगवंत आहेत’, असा भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती पालन (वय ६७ वर्षे) !

‘गुरुदेव, सर्व साधक माझा परिवार असून गुरुदेव माझा भगवंत आहे’, असाच भाव माझ्या अंतरात सदैव राहू दे.आम्हा तिघांनाही तुमच्या चरणांजवळ ठेवा’, अशी मी तुमच्या चरणी कळकळीने प्रार्थना करते.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

सेवेमुळे उपाय केले नाहीत, तर आध्यात्मिक त्रास अधिक वाढेल आणि पुढे सेवाही करता येणार नाही. प्राधान्य देऊन स्वतःचे नामजपादी उपाय पूर्ण करायला पाहिजेत. त्याचप्रमाणे शारीरिक आणि मानसिक स्तरावरच्या उपायांना प्राधान्य द्यावे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर त्यांच्या छायाचित्रापेक्षाही त्यांचे रूप अधिक तेजस्वी जाणवणे

सामान्य व्यक्तीला प्रत्यक्ष पहाण्यापेक्षा छायाचित्रात ती अधिक चांगली दिसते.सनातनच्या आश्रमात गेल्यावर प्रथमच श्री गुरुदेवांना पाहिल्यावर मला त्यांचे रूप त्यांच्या छायाचित्रापेक्षाही अधिक तेजस्वी जाणवले.

साधकांनो, सर्वस्वाचा त्याग भावनेपोटी नाही, तर भावाच्या स्तरावर करावा !

‘हे सर्व देवाचे आहे, त्याचे त्यालाच द्यायचे आहे’, यासारख्या नि:स्वार्थ विचाराने आणि भावाच्या स्तरावर कृती केल्यास ईश्वराचा आशीर्वाद लाभून जलद आध्यात्मिक उन्नती होते.’

उत्तम आकलनक्षमता, प्रेमभाव आणि सात्त्विकतेची ओढ असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. रुक्मिणी अविनाश जाधव (वय ४ वर्षे) !

नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी २ दिवस ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ।’ हा मंत्र रुक्मिणीने ऐकला. तेव्हा तिला तो लगेचच मुखोद्गत झाला आणि तिने तो अचूक म्हणून दाखवला.