‘भारतातील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या आणि त्यांचे निकाल लागायला काही दिवस अवकाश होता. तेव्हा अचानकपणे एक दिवस ‘राहुल गांधी हे दक्षिणपूर्व आशियामधील व्हिएतनाम, इंडानेशिया, सिंगापूर आणि मलेशिया या ४ राष्ट्रांना भेट देणार आहेत’, अशी घोषणा केली गेली. त्यांना चीनमधून अचानक दूरभाष आला होता. त्यामुळे ते ९.१२.२०२३ या दिवशी विदेश दौर्यावर निघणार होते. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी या ४ राष्ट्रांमध्ये का जाणार होते ? यामागे काही कारणे आहेत. सिंगापूर आणि मलेशिया येथे ते तेथे स्थायिक झालेल्या भारतियांना भेटणार होते. इंडोनेशियामध्ये ते राजकारण्यांची भेट घेणार होते, तसेच ते व्हिएतनाम येथील साम्यवादी नेत्यांची भेट घेण्याची शक्यता होती, अशी माहिती त्यांच्या स्रोतांनी दिली होती.
११ मार्च २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘व्हिएतनाम, इंडानेशिया, सिंगापूर आणि मलेशिया हे उद्योगपती अदानींसाठी महत्त्वाचे देश, तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात चीनकडून भारताला घेरण्याचा प्रयत्न, चीनच्या सभोवतालच्या ४ देशांमधील भारताची गुंतवणूक थांबवण्यासाठी चीनकडून राहुल गांधींची निवड अन् हिंदु संस्कृतीचा देश असलेल्या थायलंडची अपकीर्ती’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
भाग १ वाचण्यासाठी येथे वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/772521.html
८. राहुल गांधी यांची ‘जैसे थे’ मानसिकता !
‘अलीकडेच राहुल गांधींची एक ध्वनीचित्रफीत प्रसारित झाली. त्यात ते म्हणतात, ‘‘जे सुटाबुटात येतात, ‘बी.एम्.डब्ल्यू’सारखी महागडी चारचाकी चालवतात किंवा स्वतः उच्चभ्रू पद्धतीने लोकांसमोर येतात, त्या लोकांना मी तिकीट देत नाही.’’ मला असे म्हणायचे आहे की, ते स्वतःला राजकुमार आणि इतर सर्वांना गावंढळ समजतात का ? ‘आपल्या समोर कुणी चांगली वस्त्रे परिधान करून येऊ शकत नाही किंवा कुणी व्यावसायिक त्याच्या ‘बी.एम्.डब्ल्यू’, ‘रोल्स राईस’ या आस्थापनांच्या चारचाकी वाहनाने येऊ शकत नाही’, असे त्यांना वाटते; कारण त्यामुळे त्यांचा अहंकार दुखावला जाईल. एखाद्याने समोर एकदम फाटका किंवा भिकारी होऊन येणे त्यांना अपेक्षित असावे. लोकांनी आपल्यासमोर नेहमी भीकच मागावी, असे त्यांना वाटते; कारण ते तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. त्यांची ही मानसिकता अजूनपर्यंत पालटलेली नाही.
९. अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यासाठी राहुल गांधी निरुपयोगी !
शेवटी ते (राहुल गांधी) कुणाच्या हातातील बाहुले आहेत ? चीनचे किंवा अमेरिकेचे ? मला तुम्हाला सांगायचे आहे की, अमेरिकेने त्यांना धुडकावले आहे. त्यांना राहुल गांधी यांच्यावर डाव लावता येणार नाही आणि त्यांच्या तुलनेत नरेंद्र मोदी हे फार श्रेष्ठ नेते आहेत. ही परिस्थिती कशी हाताळावी, हे त्यांना कळत नाही. त्यामुळे ते द्विधा मनःस्थितीत आहेत. डावा कि उजवा कुणावर डाव लावावा ? कुणावर पैसे लावावेत ? हेच त्यांना समजत नाही. नुकतेच जॉर्ज सोरोस यांनीही राहुल गांधींचा नाद सोडला आहे. तो त्यांच्यासाठीही निरुपयोगी आहे. तेही राहुल यांच्यावर पैसे लावू शकत नाहीत.
१०. सत्ता मिळवण्यासाठी राहुल गांधी यांची काहीही करण्याची सिद्धता !
जेव्हा मणीपूरमध्ये दंगली चालू होत्या, तेव्हा व्हॅटिकनवरून राहुल गांधी यांना सतत भ्रमणभाष का येत होते ? जेव्हा गुंता सोडवण्याची संधी होती, त्या वेळी ते मणीपूरला गेले नाहीत; परंतु त्या आधी आणि नंतर मात्र मणीपूरमध्ये जात होते. ही राहुल गांधींची नीती आहे. विदेशी युवतीपासून निर्माण झालेली संतान कधीच देशाप्रती प्रामाणिक राहू शकत नाही. मी माझ्या अंतःकरणापासून आणि स्पष्टपणे सांगते की, जेवढे व्यंगचित्रांमधून राहुल गांधी त्यांचे हसे करू घेत आहेत, तेवढेच ते विषारी आहेत. त्यांना काहीही करून सत्तेवर यायचे आहे. त्यासाठी मग काहीही करावे लागले, म्हणजे कितीही शवांचे ढीग पडले किंवा देशाचे तुकडे पडले, तरी चालतील.
११. आतंकवादी संघटना ‘एल्.टी.टी.ई.’ला पुनर्र्जीवित करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न !
आतापर्यंत इतर मागासवर्गियांच्या संदर्भात चर्चा होत नव्हती; परंतु आता अकस्मात् उत्तर-दक्षिण विभाजन होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यांच्या तमिळनाडूला वारंवार भेटी होत होत्या; कारण अनधिकृतरित्या पुष्कळ सर्व गोष्टी पसरत होत्या. ज्यांनी त्यांच्या वडिलांचा मृत्यू घडवून आणला, त्या ‘एल्.टी.टी.ई.’ संघटनेला ते पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत होते. राहुल गांधी यांना त्यांच्या वडिलांच्या हत्येचे काहीच वाटत नाही. राजकारणात कुणीही कायमस्वरूपी मित्र आणि शत्रू नसतात. शत्रू असलेल्या ‘एल्.टी.टी.ई.’ या संघटनेला ते पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत होते; परंतु तेथे भाजपचे नेते अण्णामलाई, रवी आणि समीर वानखेडे बसले आहेत. या त्रयीने तमिळनाडूला अक्षरशः सांभाळून ठेवले आहे. नाहीतर, या माणसाने काही करायला कसर सोडली नव्हती.
१२. राहुल गांधी यांचा दक्षिण पूर्व आशियातील भारताची तटबंदी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न !
राहुल गांधी गरिबांमध्ये मिसळत असल्याचा देखावा करत असतात. ते नाटक करत आहेत, हे न समजायला लोक एवढे मूर्ख नाहीत. आता सामाजिक माध्यमांचा काळ आहे. सर्वांची कारस्थाने उघडकीस आणली जातात. बस, आता थोड्याच दिवसांची गोष्ट आहे. सत्य सर्वांच्या समोर येईलच. राहुल गांधी यांचे या ४ देशांमध्ये (व्हिएतनाम, इंडानेशिया, सिंगापूर आणि मलेशिया) जाणे भारताचा पूर्वेकडील देशांकडे किंवा दक्षिण पूर्व आशियाकडे पहाण्याचा जो दृष्टीकोन आहे, त्यावर ते प्रहार करत आहेत, याचे हे स्पष्ट प्रतिबिंब दाखवत आहे. यासाठी हिंदी महासागरात काय स्थिती आहे ते समजून घेण्याची आवश्यकता आहे.
हिंदी महासागरात ३-४ देश सक्रीय असतात. यात अमेरिका क्रमांक एकवर आहे. दुसरा क्रमांक चीनचा आहे; कारण की चीनसाठी हाच एक मार्ग आहे. याच मार्गावरून चीन पश्चिमेकडील देशांकडे जातो आणि या मार्गावर भारत उद्योगपती गौतम अदानींच्या रूपात बसला आहे, जे भारताच्या आणि हिंदुत्वाच्या बाजूने आहेत. अशा व्यावसायिकांची आपल्याला आवश्यकता आहे. राहुल गांधी यांनी काय केले, तर ‘मी या संपूर्ण क्षेत्रात भारताला घुसू देणार नाही’, ‘अदानीला घुसू देणार नाही’, असे म्हणून ते व्हिएतनामला निघून गेले. पुढे ते सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशिया या ४ देशांमध्ये त्यांचे राजकारण करायला गेले.
१३. परिषदा किंवा संमेलने यांच्या माध्यमातून गुप्त भेटी !
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, परिषदा, संमेलने ही केवळ नाममात्र असतात. जागतिक स्तरावरील परिषदांना मोठमोठी लोक जातात, तेव्हा त्यांचे महत्त्वाचे बोलणे हे जेवणाच्या पटलावर होत असते किंवा चहाच्या वेळी होते. ते खरे बोलणे असते. मी स्वतः पाहिले आहे की, परिषदेत एकीकडे सत्र चालू असते; पण त्या सत्राला कुणीही जात नाहीत. त्याऐवजी उपाहारगृहामध्ये किंवा विश्रामालयाच्या खोल्यांमध्ये समांतर खासगी बैठका चालत असतात. त्यासाठीच हे लोक जात असतात, बाकी सर्व दिखावा असतो. आता राहुल गांधी परिषदेला जातात, तेव्हा जे त्यांच्या कार्यालयात सहस्रो नोकरशहांना बसवून करता आले नाही, ते परिषदेत जाऊन काय करणार ? त्यामुळे राहुल गांधी पूर्वेकडील देशात जाणे, ही काही चांगली बातमी नाही; कारण ते जर तेथे जात असतील, तर तेथे निश्चितपणे अडचण निर्माण होत असते.
मणीपूरमधील प्रकरण शांत करायला पुष्कळ परिश्रम घ्यावे लागले. जी आग त्यांनी लावली होती, ती शांत करण्यासाठी पुष्कळ परिश्रम घ्यावे लागले. मिझोराममध्येही समस्या झाली आहे. म्यानमारहून सर्व शस्त्रधारी लोक मिझोराममध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे तेथील समस्या वाढली. देवाच्या कृपेने आपल्याकडे केंद्र सरकारमध्ये आणि स्थानिक स्तरावर काही चांगले नेते कार्यरत आहेत; म्हणून आपण त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलो.
१४. राहुल गांधी यांच्या देशविघातक कारवाया हाणून पाडण्यासाठी भारत सिद्ध !
सध्या ही सर्व प्रगती पाहिल्यावर उद्योगपती जॉर्ज सोरोस गप्प बसतील का? अर्थातच नाही. दिवा विझण्यापूर्वी जसा फडफडतो, तसे ते फडफडत आहेत. त्यामुळेच भारताची सर्व धोरणे पालटण्याविषयी बोलणे चालू आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिअल इंटलिजन्स), ‘डीप फेक’, यू ट्यूब चॅनेवाल्यांना खरेदी करणे, प्रसारमाध्यमांवर प्रभाव पाडणारे खरेदी करणे, तसेच राहुल गांधी हे आजकाल ध्वनिचित्रफितीने सुचवलेल्या रूपातही येत आहेत. पैसे घेऊन प्रसार करणार्या पत्रकारांना आता आपण पाहिलेच असेल. १४ पत्रकारांना बहिष्कृत करण्यात आले, ती एक वेगळी गोष्ट आहे.
आता सरकारही गंभीर झाले आहे. राहुल गांधी जातील, त्या ठिकाणी सरकार त्यांचा पाठपुरावा करत आहे. त्यांनी काही गोंधळ निर्माण करण्याच्या प्रयत्न केलाच, तर त्याला तोंड द्यायला सरकार सिद्ध आहे. राहुल गांधींनी मणीपूर येथे घातलेला गोंधळ हे एक उदाहरण आहे. भूतकाळात अनेक गोंधळ माजवणार्या घटना आहेत.’ (समाप्त)
– गायत्री देवी
(साभार : ‘द अल्टरनेट मिडिया’ यू ट्यूब चॅनेल)
संपादकीय भूमिका :भारताच्या विरोधात घरभेदींकडून आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात रचली जाणारी षड्यंत्रे सरकारने वेळीच उधळून लावावीत ! |