पोषण आहारापासून वंचित ५८ लाख बालके, तसेच १० लाख गर्भवती महिला आणि स्‍तनदा माता यांवर परिणाम !

राज्‍यातील बालके आणि महिला यांच्‍या आरोग्‍याची हानी करून अंगणवाडी सेविकांना काय मिळणार ? मानधनवाढीसाठी संप न पुकारता सनदशीर मार्गाचा अवलंब करावा !

मराठवाड्यात अजून २ दिवस पाऊस !

पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेत वाढलेली थंडी, ईशान्येकडील आर्द्रतायुक्त वारे आणि दक्षिणेकडून वहाणार्‍या वार्‍यांच्या संयोगातून महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे शहरामध्‍ये केवळ ३९८ विनाअनुमती बांधकामांची नोंद !

असे असेल, तर संबंधित अधिकार्‍यांनाच शिक्षा द्यायला हवी ! असे झाल्‍यास कधीतरी समाजाला शिस्‍त लागेल का ?

नागपूर येथे पीएच्.डी. फेलोशिप परीक्षेचा पेपर फुटल्‍याचा आरोप !

बार्टी, सारथी आणि महाज्‍योती या संस्‍थांच्‍या माध्‍यमातून ‘पीएच्.डी.’धारक विद्यार्थ्‍यांना दिल्‍या जाणार्‍या ‘फेलोशिप’साठी २४ डिसेंबर २०२३ या दिवशी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे चाळणी परीक्षा घेण्‍यात आली होती.

मिळकतकराची थकबाकी वसूल करण्‍यासाठी महापालिकेने ३२ मिळकतींचा लिलाव करण्‍याचा निर्णय !

यामधून १६ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली जाणार असली, तरी त्‍याचे मूल्‍य २०० कोटी रुपये आहे. महापालिकेचे उत्‍पन्‍न वाढवण्‍यासाठी महापालिकेने थकबाकीदारांच्‍या २०२ मिळकतींचा लिलाव करण्‍याचा निर्णय घेतला.

पुणे येथून सुटणार्‍या महत्त्वाच्या गाड्या २५ दिवस रहित !

पुणे  येथून सुटणार्‍या १६ एक्सप्रेस गाड्या १० फेब्रुवारीपर्यंत रहित करण्यात आल्या आहेत.‘प्रवाशांनी गाडीची चौकशी केल्याविना तिकीट काढू नये’, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

केंद्रीय अन्‍वेषण विभागाच्‍या १२ ठिकाणी धाडी !

केंद्रीय अन्‍वेषण विभागाने मुंबईसह सुरत, अमरेली, नवसारी, बक्‍सर अशा १२ ठिकाणी धाडी घातल्‍या. यात अन्‍वेषण पथकांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्‍ट्रॉनिक पुरावे जप्‍त केले आहेत.

मंत्री अब्‍दुल सत्तार यांच्‍या सोसायटीला ५० शासकीय भूखंड विक्री केल्‍याप्रकरणी सरकारसह १० प्रतिवादींना नोटीस !

स्‍वत:च्‍या ‘नॅशनल एज्‍युकेशन सोसायटी’च्‍या नावे अनधिकृतपणे ५० शासकीय भूखंड बळकावल्‍याच्‍या विरोधात छत्रपती संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे.

तासगाव नगर परिषदेकडे वारंवार तक्रार अर्ज करूनही शनैश्‍वर मंदिराशेजारील स्‍वच्‍छतागृह हटवण्‍यास प्रशासन उदासीन !

परिसरात आणखी ४ स्‍वच्‍छतागृहे असल्‍याने मंदिराशेजारील स्‍वच्‍छतागृह काढून टाकावे, यासाठी श्री. गोगटे हे नगर परिषदेकडे गेली २ वर्षे पाठपुरावा करत आहेत. या संदर्भात अनेक वेळा निवेदनही देऊन झाले; मात्र ते हटवण्‍यास प्रशासन उदासीन आहे.

China Water Missiles :चीनने त्याच्या क्षेपणास्त्रांंमध्ये दारूगोळ्याऐवजी पाणी भरले !

चीन स्वतःला कितीही आधुनिक म्हणवून घेत असला, तरी त्याची उत्पादने किती निकृष्ट दर्जाची असतात, हे वारंवार जगापुढे येत आहे !