सेवेमुळे नामजपादी उपाय करण्याकडे दुर्लक्ष केल्यास आध्यात्मिक त्रास अधिक वाढेल !
सुश्री (कु.) संगीता जाधव : ‘सेवा करतांना माझा सेवेकडेच अधिक ओढा असतो. त्या वेळी नामजपादी उपाय करण्याकडे माझे दुर्लक्ष होते आणि उपाय होत नाहीत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : सेवेमुळे उपाय केले नाहीत, तर आध्यात्मिक त्रास अधिक वाढेल आणि पुढे सेवाही करता येणार नाही. प्राधान्य देऊन स्वतःचे नामजपादी उपाय पूर्ण करायला पाहिजेत. त्याचप्रमाणे शारीरिक आणि मानसिक स्तरावरच्या उपायांना प्राधान्य द्यावे.’
साधना मनात मुरली की, अंतर्मनच त्यानुसार कृती आपोआप करून घेत असणे
सौ. प्राजक्ता पुजार : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकतांना प्रत्येक कृतीला भावाची जोड देण्यासंदर्भात जे शिकले, ते आता कृतीत येते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हे प्रगतीचे लक्षण आहे. बुद्धीला आठवल्यावर केलेली कृती प्रयत्नपूर्वक असते. साधना मनात मुरली की, अंतर्मनच ती कृती आपोआपच करून घेते.
|