मायेपासून निवारण करण्यासाठी भगवंताला शरण जाणे महत्त्वाचे !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

नृत्यन्ती तव वीक्षणाङ्गणगता कालस्वभावादिभिः
भावान् सत्त्वरजस्तमोगुणमयान् उन्मीलयन्ती बहून् ।
मामाक्रम्य पदा शिरस्यतिभरं संमर्दयन्त्यातुरं
माया ते शरणं गतोऽस्मि नृहरे त्वामेव तां वारय ।।

– श्रीमद्भागवत ‘वेदस्तुती’

अर्थ : हे प्रभु, तुझी ही माया तुझ्या दृष्टीरूपी अंगणात नृत्य करत आहे अन् काल, स्वभाव यांद्वारे सत्त्व-रज-तमोगुणी भाव दर्शवत आहे. ती माझ्या मस्तकावर चढून आतुर असल्याप्रमाणे माझे मर्दन करत आहे. हे नृसिंहा, मी तुला शरण आलो आहे. तूच मायेचे निवारण कर. – श्रीमद्भागवत

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २००९)