चौकशी समिती नियुक्त करून १५ दिवसांत मुशीर सय्यद आणि दोषी कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करणार ! – मंत्री उदय सामंत
नाशिक यथील मुशीर मुनिरोद्दीन सय्यद यांनी गावठाणमध्ये येणार्या मिळकतीवर नाशिक महापालिकेची दिशाभूल करून अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम करून तिचा वापर केला असेल, तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करून येत्या १५ दिवसांत चौकशी करण्यात येईल.