पनवेल येथील सौ. सुवर्णा नंदकुमार साळुंखे यांना साधनेला आरंभ केल्यावर आलेल्या अनुभूती
गुरुपौर्णिमेच्या रात्री माझी मुले घरी अभ्यास करत होती आणि मी लिखाण करत होते. त्या वेळी अकस्मात् मला चंदनाचा सुगंध येऊ लागला. ‘तो दैवी सुगंध कुठून येत आहे ?’, हेे शोधण्याचा मी प्रयत्न केला. हा सुगंध आल्यावर मला ‘काय करू अन् काय नको ?’, असे झाले.