‘जी-२०’ परिषदेच्‍या पार्श्‍वभूमीवर शहरात ड्रोन कॅमेर्‍याने छायाचित्रण करण्‍यास अनुमती नाही !

ड्रोन कॅमेरा

पुणे – ‘जी-२०’ परिषदेच्‍या कार्यक्रमासाठी २९ देशांतील प्रतिनिधी आणि १५ आंतरराष्‍ट्रीय संस्‍थांचे प्रतिनिधी असे जवळपास २०० मान्‍यवर उपस्‍थित रहाणार आहेत. त्‍यामुळे या कालावधीत त्‍यांच्‍या जीवितास कोणत्‍याही प्रकारचा धोका उद़्‍भवू नये, तसेच ते रहात असलेल्‍या ठिकाणी आणि भेटी देणार्‍या इतर महत्त्वाच्‍या स्‍थळांच्‍या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्‍हणून कायदा अन् सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्‍तालय कार्यक्षेत्रात सतर्कतेचा उपाय म्‍हणून १० ते २० जानेवारी २०२३ पर्यंत ड्रोन कॅमेर्‍याने छायाचित्रण करण्‍यास पोलिसांनी अनुमती नाकारली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्‍यास भारतीय दंड संहिता ८६० च्‍या कलम १८८ अन्‍वये कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही सांगितले आहे.