संभाजीनगर येथील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षक आक्रमक !
शिक्षक रामचंद्र सालेकर यांनी आमदार बंब यांना पत्र लिहिले असून शिक्षकांकडून करून घेण्यात येणार्या १५१ अशैक्षणिक कामांची सूची पाठवली आहे.
शिक्षक रामचंद्र सालेकर यांनी आमदार बंब यांना पत्र लिहिले असून शिक्षकांकडून करून घेण्यात येणार्या १५१ अशैक्षणिक कामांची सूची पाठवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे पूर्वी संचालक असलेल्या ‘ग्रीन एकर’ या आस्थापनाने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार सक्तवसुली संचालनालयाला प्राप्त झाली आहे.
२३ ऑगस्ट या दिवशी पावसाळी अधिवेशन चालू असतांना मंत्रालयासमोर धाराशिव जिल्ह्यातील तांदूळवाडी गावातील शेतकरी सुभाष देशमुख यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न केला होता.
उजनी धरण सध्या १०० टक्के भरले असून ११ ऑगस्टपासून उजनी धरणातून ‘पॉवर हाऊस’साठी १ सहस्र ६०० घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडले जात आहे. त्यातून ३२ लाख युनिट वीज सिद्ध करण्यात आली आहे.
आज वारकरी संप्रदाय किंवा अन्य काही आध्यात्मिक संघटनांचे कार्य यांमुळे कितीतरी जणांची दारू सुटल्याची उदाहरणे समाजात आढळतात. यावरून निर्व्यसनी समाजाच्या निर्मितीसाठी साधना आणि धर्मशिक्षण यांची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येईल !
या मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी गणेशोत्सवात समाजातील विविध विषयांवर जिवंत देखावे सादर केले जातात. मंडळाने यंदा ६४ व्या वर्षात पदार्पण केले असून मागील ११ वर्षांत १ सहस्रहून अधिक उपक्रम केले आहेत.
डोंबिवली पूर्व येथील ठाकुर्ली भागातील कचोरे गाव आणि आसपासचा परिसरात येथे दहशत निर्माण करून दरोडे टाकणारा सराईत गुन्हेगार सिकंदर नुरमहंमद बगाड (वय २२ वर्षे) याला टिळकनगर पोलिसांनी पत्रीपुलाजवळील कचोरे गावाच्या हद्दीतून अटक केली आहे.
विजयपूर रस्त्यावरील यामिनीनगर येथील संजय रेवू राठोड, उमेश रेवू राठोड आणि उत्तर सोलापूर येथील सोरेगाव परिसरातील राजेंद्र रेवणसिद्ध भीमदे यांनी वीजचोरी केल्याचे महावितरणच्या फिरत्या पडताळणी पथकाने उघडकीस आणले होते.
मुलांमध्ये खेळण्यातून अनेक गुणांचा विकास होतो. खेळतांना जय-पराजय असतोच. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना जय-पराजयाची सवय लागते. त्यामुळे सरकारने प्रत्येक मुलाने मैदानी खेळ खेळायला हवेत, याकडे लक्ष द्यावे,हीच अपेक्षा !
देशात ‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली गरोदर असलेल्या अनेक अभिनेत्री त्यांची अर्धनग्न आणि अश्लील छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसारित करत आहेत. हा शिक्षापात्र गुन्हा आहे. त्यांच्यावर गुन्हे नोंदवा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेने केली आहे.