संभाजीनगर – ‘अनेक शिक्षक मुख्यालयी न रहाता घरभाडे उचलत रहात आहेत’, असे सूत्र येथील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत मांडले होते. त्यानंतर अनेक शिक्षकांनी आमदार बंब यांना दूरभाष करून याचा जाब विचारला होता. त्यातच शिक्षक रामचंद्र सालेकर यांनी आमदार बंब यांना पत्र लिहिले असून शिक्षकांकडून करून घेण्यात येणार्या १५१ अशैक्षणिक कामांची सूची पाठवली आहे.
सालेकर यांनी पत्रात म्हटले आहे की, बंब यांनी शिक्षकांचे वेतन, शिक्षकांचे घरभाडे, शिक्षक मुख्यालयी रहात नसल्याची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता याविषयी विधानसभेत ऊहापोह करून शिक्षकांवर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे आपल्यासमोर आमचे वेतन आणि कार्य यांचा हिशोब सादर करणे आवश्यक वाटल्याने शिक्षकांचे कार्य विस्ताराने मांडत आहोत.