मुंबई येथील मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकर्‍याचा उपचाराच्या वेळी मृत्यू !

मुंबई – २३ ऑगस्ट या दिवशी पावसाळी अधिवेशन चालू असतांना मंत्रालयासमोर धाराशिव जिल्ह्यातील तांदूळवाडी गावातील शेतकरी सुभाष देशमुख यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न केला होता.

देशमुख यांची गावाकडील भूमी हडपल्याच्या कारणावरून त्यांनी हे कृत्य केले. बंदोबस्तातील पोलिसांनी त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली होती. घायाळ झालेल्या देशमुख यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात भरती करण्यात आले होते; मात्र २९ ऑगस्ट या दिवशी उपचार चालू असतांना त्यांचा सकाळी ११.५५ वाजता मृत्यू झाला.