राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या वाहनतळाच्या ठेकेदाराकडून पर्यटकांची लूट !
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील वाहनतळाच्या ठेकेदाराकडून पर्यटकांची लूट होत आहे. नागरिकांना ठेकेदाराच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. चारचाकी वाहनासाठी प्रतिघंटा १४ रुपये शुल्क असतांना ३० रुपये, तर दुचाकीसाठी ३ रुपयांऐवजी १० रुपये शुल्क आकारले जाते.