वीरसेनेची खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !
गावकर्यांच्या मागणीकडे प्रशासन लक्ष देईल का ? – संपादक

पालघर – जिल्ह्यातील घोडमाळ (वाडा) गावापासून ते नदीपर्यंतचा रस्ता गेल्या २१ वर्षांपासून दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे गावकर्यांची पुष्कळच गैरसोय होत आहे. रस्ता कच्चा असल्यामुळे वाहनेसुद्धा गावात येण्यास त्रास होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर महिलांना, लहान मुलांना पुष्कळ त्रास होत आहे. लोकांना कामावर जाण्यासाठी रोजच तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याची दुरवस्था एवढी आहे की, जनावरेसुद्धा चालता चालता पडतात. तरी या गंभीर परिस्थितीचा आणि सामान्य जनतेचा विचार करून हा रस्ता तात्काळ खडीकरण अन् डांबरीकरण करून दुरुस्त करावा, अशी मागणी खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे वीरसेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांनी केली आहे.
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद