१. ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्या’ची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासाठी प.पू. दास महाराज यांनी साधकांना मार्गदर्शन केले. प.पू. दास महाराज यांचे मार्गदर्शन चालू असतांना सद्गुरु सत्यवान कदम यांना काळ थांबल्याचे जाणवले.
२.‘प.पू. दास महाराज यांनी साधकांना जे मार्गदर्शन केले, त्यातून त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पराकोटीचा कृतज्ञताभाव जाणवला. त्या वेळी सर्व साधकांची पुष्कळ भावजागृती झाली आणि परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता निर्माण झाली. त्यामुळे साधकांना पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा मिळाली.
– श्री. राजेंद्र पाटील, कुडाळ, सिंधुदुर्ग. (१८.१२.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |