पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांच्या ‘गौतमारण्य’ आश्रमात मंडप घालण्याचे काम ‘सेवा’ म्हणून करणारे श्री. बाबली कळंगुटकर !

प.पू. दास महाराज

‘मी बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील गौतमारण्य आश्रमात ४-५ वर्षांपासून श्रीरामनवमीनिमित्त मंडप घालण्याची सेवा करतो. ‘मी ही सेवा न्यूनतम दरात कशी होईल ?’, हे पहातो; मात्र दुसरीकडे काम करतांना माझा व्यावहारिक दृष्टीकोन असतो.

प.पू. बाबांच्या (प.पू. दास महाराज यांच्या) समवेत असतांना मला चांगले वाटते. येथे मला आल्यावर शांत वाटते.’

– श्री. बाबली कळंगुटकर, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.१२.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक