राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना ३ मासांची मुदतवाढ

राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याच्या राज्यशासनाच्या प्रस्तावाला केंद्रशासनाने संमती दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १८१

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८१ पर्यंत पोचली आहे. मुंबईमध्ये नवीन ७ रुग्ण आढळले आहेत, तर नागपूर येथे १ नवीन रुग्ण आढळला आहे.

कोरोनारूपी असुराचा समूळ नायनाट करण्यासाठी रत्नागिरीत कालभैरवाला गार्‍हाणे

कोरोना संकटातून संपूर्ण रत्नागिरीसह तमाम जनतेला मुक्त करावे. कोरोना विषाणूची बाधा कोणालाही होऊ नये आणि रत्नागिरीतल्या नागरिकांना कायद्याच्या शिस्तीचे पालन करण्याची सबुद्धी प्राप्त होवो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कोणाची ओळख असल्याशिवाय होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

‘साधकांनो, स्वतःत अहं वाढू न देण्यासाठी देवाप्रती क्षणोक्षणी कृतज्ञ राहूया !’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

देवाने आपल्याला सुदृढ आणि सक्षम अवयव दिले आहेत. त्यासाठी आपण सतत देवाच्या चरणी कृतज्ञ राहूया.

सध्या ‘कोरोना’मुळे भारतभरातील दळणवळण बंद असल्याने एप्रिल २०२० पासून कुंडलिनीचक्रांवर लावावयाच्या ‘निर्गुण’ या नामजपाच्या पट्ट्या वैयक्तिक स्तरावर बनवून घ्या !

१.४.२०२० ते ३०.६.२०२० या कालावधीत सहस्रार आणि विशुद्ध या चक्रांवर ‘निर्गुण’ या नामजपाच्या पट्ट्या लावायच्या आहेत.

१.४.२०२० ते ३०.६.२०२० या कालावधीत समष्टीसाठी नामजप करणार्‍यांनी आणि समष्टी स्तरावरील त्रास दूर होण्यासाठी साधकांनी करावयाचे नामजपादी उपाय

सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. कालमाहात्म्यानुसार सर्वसाधारणपणे सध्या साधकांना होणार्‍या त्रासांपैकी ७० टक्के त्रास समष्टी स्तरावरील, तर ३० टक्के त्रास व्यष्टी स्तरावरील आहेत.

खरे शिष्य

‘सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत पाळणारेच खरे शिष्य असल्याने गुरूंना त्यांच्यासाठी आत्मिक परमेश्‍वरी सामर्थ्य खर्चावे न लागणे’