‘चुकांचे प्रमाण अल्प आणि अधिक असणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक ठेवलेल्या पाकिटांकडे पाहून अन् ती पाकिटे हातात घेतल्यावर काय जाणवते ?’, याविषयी साधकांनी केलेला सूक्ष्मातील प्रयोग !
‘अध्यात्मात परिपूर्ण सेवा करण्याला महत्त्व आहे. परिपूर्ण अशा ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर साधकाची प्रत्येक कृती अचूक व्हायला हवी. सेवेत चुका झाल्यामुळे रज-तम वाढून सात्त्विकता न्यून होते. अध्यात्मातील हे सूत्र अधोरेखित करणारा सूक्ष्मातील एक प्रयोग सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात घेण्यात आला.