इटलीमधील सुप्रसिद्ध ‘चर्च’मध्ये पू. तनुजा ठाकूर यांनी अनुभवलेली नकारात्मक शक्ती !

पू. तनुजा ठाकूर

१. इटलीतील सुप्रसिद्ध ‘चर्च’ भूतबंगल्यापेक्षाही भयावह असणे

‘जून २०१३ मध्ये मी आध्यात्मिक संशोधनाच्या उद्देशाने युरोपला गेले होते. तेव्हा मला इटलीतील काही साधकांनी मिलान येथील इटलीतील सुप्रसिद्ध ‘चर्च’ पहाण्याचा आग्रह केला. मी त्या ‘चर्च’मध्ये गेल्यावर तेथील स्थितीविषयी मला जे सूक्ष्मातून जाणवले, ते पाहून मी आश्चर्यचकित झाले. ती स्थिती एवढी भयावह होती की, त्या ‘चर्च’पुढे आपल्याकडील ‘भूतबंगला’ काहीच नाही.

२. कित्येक शतकांपासून अतृप्त आत्मे रहात असल्याचे जाणवणे

त्या ‘चर्च’ला सूक्ष्म अतृप्त आत्म्यांनी कित्येक शतकांपासून आपले घर बनवून ठेवले होते. तिथे प्रत्येक खोलीमध्ये सूक्ष्मातून पाहिले असता अत्यंत भयावह काळोख पसरला होता.

३. तिथे ज्या प्राचीन वस्तू ठेवल्या होत्या, त्यावरही पुष्कळ त्रासदायक आवरण होते.

४. तिथे ‘पाद्री’ (ख्रिस्त्यांच्या धार्मिक कृती करणारी अधिकृत व्यक्ती) प्रार्थना करवून घेतात, असा एक प्रार्थना कक्षही होता; परंतु तेथील तीव्र अनिष्ट शक्तींमुळे वातावरणावर त्या प्रार्थनेचा प्रभाव जराही पडत नव्हता.

५. त्या ‘चर्च’मधील कलाकृतींमधूनही अनिष्ट स्पंदने येत होती.

६. ‘चर्च’मध्ये गेल्यावर झालेले त्रास

त्या ‘चर्च’मध्ये प्रवेश केल्यावर काही क्षणांतच मला मळमळायला लागले आणि तेथील अनिष्ट शक्ती तीव्रतेने माझी प्राणशक्ती खेचून घेऊ लागल्या. मी तिथे आध्यात्मिक संशोधनाच्या उद्देशाने गेले होते, हे तेथील सूक्ष्म शक्तींनासुद्धा ठाऊक होते; म्हणून त्या माझी प्राणशक्ती खेचून घेत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी तिथले निरीक्षण करून त्वरित बाहेर निघून आले. तिथे प्रतिदिन अनेक पर्यटक येतात आणि त्याची भरपूर प्रशंसा करतात. तेव्हा ‘अज्ञानात आनंद असतो ! ही म्हण सत्यच आहे’, हे लक्षात येते.

७. चर्च आणि हिंदूंच्या मंदिरातील स्थिती अनुभवल्यावर ख्रिस्त्यांचा धर्म अन् त्यांचे अध्यात्म अजून बाल्यावस्थेतच असल्याचे लक्षात येणे

मी नित्य पूजाअर्चा होणार्‍या हिंदूंच्या अतीप्राचीन मंदिरांमध्येही गेले आहे. तिथे मी पुष्कळ शांती आणि शीतलता अनुभवली; परंतु मी आजपर्यंत जेवढी प्राचीन ‘चर्च’ पाहिली, तेथे सगळीकडे भुतेच आढळली. यावरून हे लक्षात येते की, हिंदूंच्या देवस्थानात कर्मकांडांच्या नियमांचे कठोर पालन केल्यामुळे तिथे पावित्र्य असते. यावरून ‘ख्रिस्त्यांचा धर्म आणि त्यांचे अध्यात्म अजून बाल्यावस्थेतच आहे’, हे लक्षात येते. सात्त्विकतेच्या अभावामुळे आज पाश्चिमात्य देशांमध्ये ‘चर्च’चे व्यापक स्तरावर ‘हॉटेल’ आणि अन्य पर्यटनस्थळांच्या रूपात परिवर्तन केले जात आहे.’

– पू. तनुजा ठाकूर (साभार ‘मासिक वैदिक उपासना’, वर्ष २, अंक १०)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.