६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्कर (वय १४ वर्षे) हिने एका हिंदी चित्रपटातील एका गाण्यावर सादर केलेल्या नृत्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘२३ जून २०२१ या दिवशी सनातनची ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. शर्वरी कानस्कर हिने एका हिंदी चित्रपटातील एका गाण्यावर नृत्य सादर केले. या नृत्याचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

कु. शर्वरी कानस्कर

हे नृत्य सादर करत असतांना कु. शर्वरीने डोक्याच्या मागे फेटा घातलेल्या मुलाचा मुखवटा लावला होता आणि मागच्या बाजूला मुलाचा पोशाख घातला होता. तिची समोरची बाजू मुलीची असून तिने दोन वेण्या घातल्या होत्या आणि घागरा घातला होता. अशा प्रकारे या गाण्यातील प्रियकराच्या संवादाच्या वेळी शर्वरीची मागील बाजू समोर येऊन मुलाचा मुखवटा घालून ती गाण्यातील शब्दांनुसार मुद्रा करत होती. त्याचप्रमाणे गाण्यातील प्रेयसीचा संवाद चालू असतांना तिच्या तोंडवळ्याची बाजू समोर येत होती आणि ती नृत्याला अनुसरून असणारे हावभाव आणि मुद्रा करत होती. 

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

१. कु. शर्वरीने केलेल्या नृत्याची वैशिष्ट्ये

१ अ. कु. शर्वरीचे नृत्यातून शृंगाररस आणि प्रेमरस व्यक्त होणे : कु. शर्वरीचे नृत्य चालू असतांना तिच्यातील रजोगुण आणि त्यानुरूप असणारे हावभाव नृत्यातून व्यक्त होत होते. त्याचप्रमाणे तिच्या नृत्यातून शृंगाररस आणि प्रेमरस व्यक्त होत होते.

१ आ. नृत्यात कु. शर्वरीने घातलेल्या मुखवट्याचे वैशिष्ट्य : तिच्या डोक्याच्या मागे लावलेल्या मुखवट्याकडे पाहिल्यावर तो सजीव असल्याप्रमाणे वाटत होता.

१ इ. संगीत आणि नृत्य यांचा केंद्रबिंदू भगवंत नसून प्रियकर आणि प्रेयसी यांचा संवाद असल्यामुळे हे नृत्य मानसिक स्तरावर केले जाणे : या नृत्याच्या संगीतामध्ये एक प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातील होळीच्या दिवशी एकमेकांना रंग लावतांना झालेल्या संवादाचे वर्णन केले आहे. या गाण्याचा केंद्रबिंदु भगवंत नसून प्रियकर किंवा प्रेयसी आहेत. त्यामुळे हे गाणे ऐकतांना किंवा नृत्य पहातांना ईश्वराप्रतीचा भाव जागृत न होता मनात विविध भावना जागृत होऊन मायेतील विचार वाढतात.

चित्रपटातील गाण्यावर नृत्य करतांना कु. शर्वरी कानस्कर

१ ई. नृत्य करत असतांना कु. शर्वरीमध्ये रजोगुण वाढून तिच्या मनातील भावना जागृत होणे : कु. शर्वरीचे या गाण्यावरील नृत्य हे तिने आधी केलेल्या कथ्थकच्या शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणापेक्षा अल्प प्रमाणात सात्त्विक वाटत होते. या नृत्याच्या वेळी कु. शर्वरीचा रजोगुण वाढून तिच्या मनातील भावना जागृत झाल्या होत्या. त्यामुळे ‘तिने केलेले हे नृत्य मानसिक स्तरावरील असून त्याचा ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने काहीच लाभ नाही’, असे जाणवले. कु. शर्वरीने केलेल्या या नृत्यातून मनोरंजन होत असल्याचे जाणवले.

१ उ. नृत्यामध्ये सात्त्विकता किंवा चैतन्य न जाणवणे : त्याचप्रमाणे या नृत्याचे संगीत आणि नृत्य हे ईश्वराशी संबंधित नसल्यामुळे त्यामध्ये सात्त्विकता किंवा चैतन्य जाणवले नाही. जेव्हा तिचे नृत्य चालू होते, तेव्हा वाईट शक्ती हस्तक्षेप करून कु. शर्वरीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवले.

मुखवटा घालून नृत्य करतांना कु. शर्वरी कानस्कर

२. सात्त्विक, राजसिक आणि तामसिक कला

मूळ कला ही तिचे प्रस्तुतीकरण करणार्‍या व्यक्तींनुसार सात्त्विक, राजसिक किंवा तामसिक स्वरूपाची होते.

२ अ. विविध रसांनुसार त्रिगुणांच्या कलेचे प्रकार : जेव्हा नृत्यात ‘शांतरस’ प्रबळ असतो, तेव्हा ती ‘सात्त्विक कला’ होते.

जेव्हा कलेमध्ये ‘शृंगार, हास्य, करुण, वीर किंवा अद्भुत’ हे रस प्रधान असतात, तेव्हा ती ‘राजसिक कला’ होते.  जेव्हा नृत्यात ‘रौद्र, भयानक आणि बीभत्स’ हे रस प्रभावी असतात, तेव्हा ती ‘राजसिक किंवा तामसिक कला’ बनते.

२ आ. मानसिक स्तरावरील आणि आध्यात्मिक स्तरावरील कला : जेव्हा कलेमध्ये भक्तीरस प्रधान असतो, तेव्हा ती ‘सात्त्विक कला’ असते आणि तिचा लाभ आध्यात्मिक स्तरावर होतो. जेव्हा संगीत किंवा नृत्य यांचा केंद्रबिंदू व्यक्ती असून प्रेमरस प्रबळ असतो, तेव्हा ती कला राजसिक होते आणि ती मानसिक स्तरावरील कला असते. जेव्हा संगीत किंवा नृत्य यांचा केंद्रबिंदू ‘देवतांचे विडंबन करणे’, हा असतो, तेव्हा ती ‘तामसिक कला’ होते. यावरून संगीत किंवा नृत्य सादर करण्यामागील उद्देशानुसार कलेतून सात्त्विक, राजसिक किंवा तामसिक गुणाच्या लहरींचे प्रक्षेपण होते.

कु. मधुरा भोसले

३. मूळ एका चित्रपटातील एका गाण्यावर एका अभिनेत्रीने सादर केलेले नृत्य आणि साधिका कु. शर्वरी कानस्कर हिने सादर केलेले नृत्य यांतील भेद

तात्पर्य

मायेतील विषयावर गायन, वादन किंवा नृत्य केल्यास त्यातून राजसिक स्पंदने प्रक्षेपित होतात आणि अशा प्रकारे कला सादर करणार्‍या कलाकारांवर वाईट शक्ती नियंत्रण मिळवू शकतात. त्याचप्रमाणे मायेतील कलेचे सादरीकरण पहातांना कंटाळा येतो. याउलट ईश्वरप्राप्तीसाठी गायन, वादन किंवा नृत्य केल्यास त्यातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात आणि त्यांतून पुष्कळ प्रमाणात आनंद जाणवतो अन् ही कला पहातांना कंटाळा येत नाही.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.७.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.