आगामी भीषण काळात तरून जाण्यासाठी भाऊबीजेच्या दिवशी बहीण-भावाने करायची प्रार्थना !

‘भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. त्यानंतर भाऊ बहिणीला तिच्या नित्य उपयोगाच्या वस्तू, ग्रंथ अशी भेट देतो. प्रतिवर्षाप्रमाणेच यावर्षीही भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊ शकतो.

काश्मीर खोर्‍यामध्ये ३५ वर्षांनंतर हिंदूंनी काढली धार्मिक मिरवणूक !

यापुढे जाऊन काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

अझरबैजानच्या सैनिकांकडून चर्चवर चढून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा

धर्मांधांचा अन्य धर्मियांप्रतीचा द्वेष पहाता संपूर्ण जगाने इस्लामी कट्टरतावादाच्या आणि आतंकवादाच्या विरोधात उभे ठाकणे आवश्यक आहे !

युद्धातील कुशल नेतृत्वाचे महत्त्व

भारत-चीन युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याची स्थिती चांगली नव्हती. भारताकडे अतिशय जुनी शस्त्रे होती. भारताकडे सेन्च्युरीयन आणि शेरमान बनावटीचे रणगाडे होते. ते दुसर्‍या महायुद्धात वापरले गेले होते.

बंगाल अल् कायदाचा अड्डा बनला असून काश्मीरपेक्षाही तेथे वाईट परिस्थिती ! – भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती तिच्याकडून पालटली जाणार नसल्याने केंद्र सरकार हे अड्डे नष्ट का करत नाही अन् बंगालची स्थिती सुधारण्यासाठी तेथील सरकार विसर्जित का करत नाही ?, असे प्रश्‍न हिंदूंना पडतात !

महानगरपालिका शाळांमधील गळती ?

महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या भौगोलिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे; पण तेथील शाळांची संख्या दिवसेंदिवस न्यून होत चालली आहे, हे दुर्दैवी आहे. परभणी महापालिकेमध्ये मराठी माध्यमाच्या केवळ २ शाळाच शेष आहेत.

आजचा वाढदिवस

कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया (१६.११.२०२०) या दिवशी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील कु. संस्कृती नीलेश कांबळे हिचा वाढदिवस आहे.

सिंधुदुर्गात १४० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात ९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र ७० झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ७९३ आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे मळगाव (तालुका सावंतवाडी) येथे १९ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन

दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, विभाग सिंधुदुर्गच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे प्रदर्शन मळगाव येथे भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ नोव्हेंबरपर्यंत चालू रहाणार आहे.

निवडणूक निकालाच्या विरोधात आठवड्यानंतर ट्रम्प समर्थकांचे आंदोलन : पोलिसांशीही झटापट

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल घोषित होऊन आता आठवडा झाला आहे; परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निकाल अजूनही स्वीकारलेला नाही. पेनसिल्व्हेनिया, नेवादा यांसारख्या ठिकाणी मतमोजणीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप ट्रम्प आणि त्यांचे समर्थक यांनी केला आहे.