अझरबैजानच्या सैनिकांकडून चर्चवर चढून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा

धर्मांधांचा अन्य धर्मियांप्रतीचा द्वेष पहाता संपूर्ण जगाने इस्लामी कट्टरतावादाच्या आणि आतंकवादाच्या विरोधात उभे ठाकणे आवश्यक आहे !

बाकू (अझरबैजान) – इस्लामी देश अझरबैजान आणि ख्रिस्ती देश आर्मेनिया यांच्यातील युद्ध थांबले असले, तरी इस्लाम अन् ख्रिस्ती यांच्यातील द्वेष थांबलेला नाही, असे एका व्हिडिओतून दिसून आले आहे.

 (सौजन्य : Answering ISLAM)

सामाजिक माध्यमांतून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये अझरबैजानचा एक सैनिक एका चर्चवर चढून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत आहे. हा व्हिडिओ करबाख येथील असून तेथेच या दोन्ही देशांमध्ये युद्ध चालू होते. या भागावर सध्या अझरबैजानने नियंत्रण मिळवले आहे. यापूर्वी अझरबैजानने आर्मेनियातील सुशी शहरातील एका चर्चला नष्ट केल्याचे समोर आले होते.