बंगाल अल् कायदाचा अड्डा बनला असून काश्मीरपेक्षाही तेथे वाईट परिस्थिती ! – भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती तिच्याकडून पालटली जाणार नसल्याने केंद्र सरकार हे अड्डे नष्ट का करत नाही अन् बंगालची स्थिती सुधारण्यासाठी तेथील सरकार विसर्जित का करत नाही ?, असे प्रश्‍न हिंदूंना पडतात !

भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष

कोलकाता (बंगाल) – काही दिवसांपूर्वी कूचबिहारमध्ये अल् कायदाच्या आतंकवाद्यांची ओळख पटवण्यात आली होती. त्यांचे जाळे बंगालमध्ये विस्तारले आहे. हे राज्य आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे. येथील परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट बनलेली आहे, असा आरोप भाजपचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.