चापोली धरणावरील अश्‍लील चित्रीकरण प्रकरण

अश्‍लील चित्रीकरण प्रकरणlत निलंबित केलेले कर्मचारी कामावर रूजू

मुरगाव पोर्ट ट्रस्ट बंदरात कोळसा हाताळणार्‍या १९ आस्थापनांना ‘सेस’ भरण्याविषयी गोवा सरकारची नोटीस

कोळशाची वाहतूक करणार्‍यांकडून सेस गोवा ग्रामीण विकास आणि कल्याण सेस या नावाने वसूल केला जातो.

कोरगाव, पेडणे येथून २० लाखांचे अमली पदार्थ कह्यात

८ सहस्र ६०० रुपयांचा गांजा, ५ लाख ६० सहस्र रुपयांचा चरस आणि १४ लाख रुपये किमतीची कॅनाबिस लागवड कह्यात घेण्यात आली.

सिंधुदुर्गात २२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या १९६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत.

गोव्यातील खाणी चालू करण्याविषयी शासन गंभीर ! – प्रल्हाद जोशी, केंद्रीय खाणमंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर गोव्यातील खाणी बंद झाल्या आहेत.

मोरजी (गोवा) येथील अनेक भूखंड देहली येथील बांधकाम व्यावसायिक आणि रशियाचे नागरिक यांच्या कह्यात !

मोरजीतील भूखंड परप्रांतीय आणि विदेशी यांच्या कह्यात जात असतांना स्वतःला ‘गोमंतकियांसाठी झटणार्‍या’ म्हणणार्‍या संघटना गप्प का ?

परिस्थिती पाहून ८ ते १० दिवसांमध्ये दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

दिवाळीच्या कालावधीत रस्त्यांवर झालेल्या गर्दीमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच तज्ञांकडून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे पुढील ८ ते १० दिवसांमध्ये परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी दिली.

बिहारमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

बिहारमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येत आहे.

गाडीवर ‘प्रेस’चे ‘स्टिकर’ लावून गांजाची वाहतूक करणार्‍या २ सराईत गुन्हेगारांना पुण्यातून अटक

पोलिसांना संशय येऊ नये म्हणून गाडीच्या काचेवर ‘प्रेस’चे ‘स्टिकर’ तसेच ‘निळा प्रहार स्पेशल फोरम तालुका अध्यक्ष’ या नावाचे स्टिकर लावून गांजाची वाहतूक करणार्‍या रवींद्र योसेफ आढाव आणि गोरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.