गोव्यातील खाणी चालू करण्याविषयी शासन गंभीर ! – प्रल्हाद जोशी, केंद्रीय खाणमंत्री

प्रल्हाद जोशी

पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात खाणी चालू करण्यासंबंधी गोवा शासनाच्या प्रस्तावाचा केंद्रशासन गांभीर्याने विचार करत आहे, असे मत केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर गोव्यातील खाणी बंद झाल्या आहेत. खाणी चालू करण्यासाठी गोवा शासनाने प्रस्ताव दिलेला आहे आणि केंद्र सध्या या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत आहे; मात्र याविषयी तुर्तास काहीच अधिक माहिती मी देणार नाही.’’