चापोली धरणावरील अश्‍लील चित्रीकरण प्रकरण

निलंबित केलेले कर्मचारी कामावर रूजू

पणजी – चापोली धरणावर अभिनेत्री पूनम पांडे यांना अश्‍लील चित्रीकरण करण्यास अनुमती दिल्यावरून जलस्रोत खात्याच्या ६ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना पुन्हा शासकीय सेवेत घेण्यात आले आहे. गाकुवेध या संघटनेने त्यांना पुन्हा सेवेत घेण्याविषयी जलस्रोत मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.