Diwali resolution in US House :अमेरिकेच्या संसदेत मांडला दिवाळीचे महत्त्व सांगणारा ठराव

दिवाळीचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेेखित करणारा ठराव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला.

पाकिस्तानच्या वायूदलाच्या तळावरील आतंकवादी आक्रमणात ३ लढाऊ विमाने नष्ट

पाकिस्तानने जे पेरले आहे, तेच उगवत आहे. पाकिस्तानसाठी जिहादी आतंकवाद आता भस्मासुर ठरू लागला असून तो आता पाकच्याच डोक्यावर हात ठेवत आहे !

नेपाळमधील भूकंपात आतापर्यंत १५४ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये ३ नोव्हेंबरला रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी झालेल्या भूकंपात आतापर्यंत १५४ लोकांचा मृत्यू झाला, तर १४० हून अधिक लोक घायाळ झाले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवण्यात आली.

Israel Gaza War : हमास आतंकवाद्यांना इजिप्तमध्ये पाठवत आहे ! – इस्रायली सैन्य

इस्रायली सैन्य हमासची ठिकाणे आणि सुरुंग शोधून त्यांच्यावर आक्रमण करत आहे. त्यामुळे आता इस्रायली सैनिक आणि हमासचे आतंकवादी यांच्यात थेट युद्ध चालू झाले आहे. अशातच हमास त्याच्या अनेक आतंकवाद्यांना इजिप्तमध्ये पाठवत असल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे.

बलुचिस्तानमध्ये सुरक्षादलाच्या वाहनांवर केलेल्या आक्रमणात १४ पाकिस्तानी सैनिक ठार

बलुचिस्तानमध्ये सुरक्षादलाच्या वाहनांवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार पासनीहून ग्वादरकडे जाणार्‍या सैन्याच्या २ वाहनांवर ओरमारा भागात आतंकवाद्यांनी आक्रमण केले.

Netanyahu on Hezbollah : हिजबुल्लाने चूक केली, तर त्याला अशी किंमत मोजावी लागेल, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल !

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता एक मास होत आला असून लेबनॉनची आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला याने इस्रायल अन् अमेरिका यांना थेट विनाशाची धमकी दिली.

गाझामधील मुलांचे दुःख समजून घेतांना पाकिस्तानमधील हिंदूंचेही दुःख समजून घ्या ! – दानिश कनेरिया, माजी क्रिकेटपटू, पाकिस्तान

पाकिस्तानमधील सोडा भारतातील हिंदूंचे दुःख भारतातील क्रिकेट किंवा अन्य क्रीडा प्रकारातील हिंदु खेळाडू कधी समजून घेत नाहीत कि त्यांच्यासाठी उभे रहात नाहीत, हे हिंदूंचे दुर्दैव !

आता आम्हाला कुणीही रोखू शकत नाही ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

आम्ही गाझा शहरात आधीच प्रवेश केला आहे. आता आम्हाला कुणीही रोखू शकत नाही, असे विधान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले.

रशियाचा वॅगनर गट हिजबुल्लाला क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवणार !

इस्रायल-हमास युद्धात रशियातील वॅगनर या बंडखोर लष्करी गटाने  उडी घेतली आहे. या गटाने इराण समर्थित हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला एस्ए-२२ ही हवाई क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवण्याची सिद्धता दर्शवली आहे.

अमेरिकेत अवैध पद्धतीने घुसलेल्या ९७ सहस्र भारतियांना एका वर्षात अटक केल्याचा दावा !

अशी आकडेवारी आणि त्यामागील कारण सांगून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव नसेल कशावरून ?