नेपाळमधील भूकंपात आतापर्यंत १५४ जणांचा मृत्यू

भारतातही जाणवले धक्के !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये ३ नोव्हेंबरला रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी झालेल्या भूकंपात आतापर्यंत १५४ लोकांचा मृत्यू झाला, तर १४० हून अधिक लोक घायाळ झाले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवण्यात आली. याचे केंद्र काठमांडूच्या वायव्येस ३३१ किलोमीटर अंतरावर भूमीमध्ये १० किलोमीटर खोल होते. या भूकंपात नेपाळमधील २ जिल्ह्यांची सर्वाधिक हानी झाली.

या भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. उत्तरप्रदेश, पंजाब, देहली, हरियाणा, बिहार, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांतही भूकंपाचे धक्के जाणवले. यात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.