इस्लामाबाद (पाकिस्तान) – बलुचिस्तानमध्ये सुरक्षादलाच्या वाहनांवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार पासनीहून ग्वादरकडे जाणार्या सैन्याच्या २ वाहनांवर ओरमारा भागात आतंकवाद्यांनी आक्रमण केले. बलुचिस्तानचे हंगामी मुख्यमंत्री अली मर्दान डोमकी यांनी या आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला आहे. या आक्रमणात सहभागी असलेल्या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी शपथ त्यांनी घेतली आहे.
सौजन्य विऑन
यापूर्वी पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (टीटीपीने) केलेल्या आत्मघातकी आक्रमणात पाकिस्तानी सैन्याचे ९ सैनिक ठार झाले होते.