पाकिस्तानच्या वायूदलाच्या तळावरील आतंकवादी आक्रमणात ३ लढाऊ विमाने नष्ट

सर्व ९ आतंकवादी चकमकीत ठार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियांवली या पाकच्या वायूदलाच्या तळावर ९ आतंकवाद्यांनी आक्रमण केले. या आतंकवाद्यांनी येथील लढाऊ विमानांची मोठ्या प्रमाणावर हानी कली. पाकचे वायूदल आणि आतंकवादी यांच्यातील चकमकीत हे सर्व ९ आतंकवादी ठार झाले. या चकमकीच्या वेळी आतंकवाद्यांनी ३ लढाऊ विमाने आणि १ इंधन टँकर नष्ट केले. तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान (टीजेपी) या आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे.

सौजन्य टाइम्स नाऊ 

संपादकीय भूमिका 

पाकिस्तानने जे पेरले आहे, तेच उगवत आहे. पाकिस्तानसाठी जिहादी आतंकवाद आता भस्मासुर ठरू लागला असून तो आता पाकच्याच डोक्यावर हात ठेवत आहे !