चीनकडून तेथील विद्यार्थ्यांमध्ये सत्ताधारी साम्यवादी पक्षाविषयी निष्ठा जागृत करण्यासाठी कायदा संमत !

यावरून चीनमधील अभ्यासक्रमात साम्यवाद्यांचे उदात्तीकरण करणारा अभ्यासक्रम असणार, हे निश्‍चित ! साम्यवादाविषयी असा खोटा इतिहास शिकून निर्माण झालेली पिढी कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !

अमेरिकेच्या नागरिकांवर आक्रमण केले, तर आम्ही गप्प बसणार नाही ! – अँटनी ब्लिंकन, परराष्ट्रमंत्री, अमेरिका

आम्हाला इराणशी वाद नको आहे; पण जर इराण किंवा त्याच्यावतीने इतर कुणी अमेरिकेच्या नागरिकांवर जगात कुठेही आक्रमण केले, तर अमेरिका गप्प बसणार नाही.

४ वर्षांतून एकदा होणारी हिंदूंचे जागतिक व्यासपीठ असलेली ‘द वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ यंदा थायलंडमध्ये !

२४-२६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन !
हिंदु महामेळ्याला उपस्थित रहाण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !

आतंकवादी आक्रमण मग ते मुंबई असो कि किबुत्समध्ये, ते अयोग्यच आहे ! – अमेरिका

आतंकवादी कारवाया इस्लामिक स्टेट, बोको हराम, अल् शबाब, लष्कर-ए-तोयबा किंवा हमासने केलेल्या असोत. सर्व ठिकाणी लोकांनाच लक्ष्य करण्यात येते, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत केले.  

म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केल्याची घटना आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरू शकतो ! – संयुक्त राष्ट्रे

भारताने याविषयी कारवाई करण्याची मागणी केली का ? किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर याविषयी आवाज उठवला का ?

हमासला जगातून कायमचे नष्ट करणे आवश्यक !  – श्री ठाणेदार, खासदार, अमेरिका

अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी  ‘हमास’ या आतंकवादी संघटनेला जगातून कायमचे नष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. ठाणेदार यांनी हमासचे वर्णन ‘पाशवी आतंकवादी संघटना’ असे केले आहे.

आतंकवाद्यांना मृत इस्रायली युवतींवर बलात्कार करण्याचा होता आदेश !

इस्रायलच्या सैन्याने हमासच्या काही आतंकवाद्यांना अटक केली आहे. अशा ६ आतंकवाद्यांच्या केलेल्या चौकशीत काही सूत्रे समोर आली आहे. ‘७ ऑक्टोबरला लोकांची हत्या आणि अपहरण करण्यासाठीच आम्ही इस्रायलमध्ये घुसलो होतोे.

इस्रायलला स्वसंरक्षण करण्याचा अधिकार ! – चीन

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. यानंतर चीनच्या प्रसारमाध्यमांनी वरील वृत्त दिले आहे.

भुकेकंगाल पाकने केली ‘घोरी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

५ वर्षांपूर्वीही या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र ७०० किलो वजनाची परमाणू शस्त्रे वाहून नेऊ शकते, असा दावा पाककडून वारंवार करण्यात येतो.

पुणे येथे रस्त्यांवर इस्रायलच्या राष्ट्रध्वजांचे स्टिकर्स लावून त्यांची विटंबना !

गेल्या काही दिवसांतील पुणे येथे आतंकवादी सापडण्याच्या घटना पहाता इस्रायलचा विरोध आणि हमासचे अप्रत्यक्ष समर्थन करणारे पुणे शहरात असणे धोकादायक !