असे सर्वत्रच जलदगतीने न्याय मिळणे अपेक्षित !

भोपाळमधील मांडवा येथे ८ जून या दिवशी ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी होऊन अवघ्या ३२ दिवसांत न्यायालयाने विष्णु नावाच्या दोषीला फाशीची शिक्षा सुनावली.

काँग्रेसचा हिंदूंची मते मिळवण्याचा प्रयत्न जाणा !

काँग्रेसच्या राजस्थान सरकारने भटक्या जनावरांच्या देखभालीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘नंदी गाय आश्रय स्थान’ निर्माण करण्याची घोषणा केली, तर मध्यप्रदेशातील सरकारने गोशाळेसमवेत ‘राम वन गमन पथ’ विकसित करण्याची घोषणा केली.

धर्मांधांचा चिखावणीखोर कांगावा लक्षात घ्या ! 

अलीकडेच जमावाच्या मारहाणीत तबरेज नावाची व्यक्ती ठार झाली होती. या पार्श्‍वभूमीवर धर्मांधांनी सामाजिक माध्यमावरून चिथावणीखोर व्हिडिओ प्रसारित केला. त्यात  ‘जर त्याच्या (तबरेजच्या) मुलाने उद्या सूड घेतला, तर ‘प्रत्येक मुसलमान आतंकवादी असतो’, हे म्हणू नका’, असे म्हटले आहे.

पाद्रयांचे वासनांध रूप जाणा !

कोच्ची (केरळ) येथे ‘बॉईज होम’ या वसतीगृहातील मुलांचे लैंगिक शोेषण केल्याच्या प्रकरणी जॉर्ज आलिया जॅरी या ४० वर्षीय पाद्रयाला पोलिसांनी अटक केली आहे.

काश्मीरच्या दिशेने वाटचाल करत असलेला बंगाल !

बंगालच्या नादिया जिल्ह्यात ‘जय श्रीराम’ म्हटल्याने कृष्णा देबनाथ या भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली………..

राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे स्वरूप जाणा !

१ मे २०१९ या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका पदाधिकारी कैलास रामचंदानी यांना अटक करण्यात आली.

जनतेला साधना न शिकवल्याचा परिणाम !

देशात मद्यसेवन करणार्‍या १६ कोटी लोकांपैकी ५ कोटी ७० लाख लोकांना दारूचे व्यसन आहे. तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या मद्यपानाच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे, असे केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

फुटीरतावाद्यांचे खरे स्वरूप काश्मिरी जनता कधी समजणार ?

काश्मीरमधील तरुणांना दगडफेक करण्यास लावणार्‍या ११२ फुटीरतावादी नेत्यांची २१० मुले परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत, तर काही जण तेथेच स्थायिक झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

भ्रष्टाचारातही तृणमूल काँग्रेस आघाडीवर !

बंगालमधील सरकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना २०० ते २५ सहस्र रुपयांपर्यंत लाच द्यावी लागत आहे. याविरोधात स्थानिक नागरिक आंदोलन करत असल्याने तृणमूल काँग्रेसचे नेते घर सोडून पलायन करत आहेत.

राजधानी देहलीत हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

देहली येथील चांदणी चौकातील चावडी बाजारातील हौजकाजी येथील एका मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मंदिरातील महाकाली, भगवान शिव आणि गणपति या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली.


Multi Language |Offline reading | PDF