भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक (लॅपटॉप) यांद्वारेही कोरोना पसरू शकतो ! – प्रा. सरमन सिंह आणि शास्त्रज्ञ रजनीकांत
भ्रमणभाष, संगणक आणि भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आदी प्रतिदिन स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याद्वारेही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाची लागण झालेले रुग्ण तुमच्या आजूबाजूला असतील, तरच हा संसर्ग या उपकरणांच्या माध्यमातून पसरू शकतो.