जीवनाचे सार असलेल्या श्रीमद्भगवद्गीतेचा शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करणे आवश्यक ! – अभिनेत्री मौनी रॉय

एवढ्या मोठ्या चित्रपटसृष्टीत केवळ एखाद-दुसरी व्यक्तीच श्रीमद्भगवद्गीतेविषयी अशी मागणी करतेे, हे लक्षात घ्या ! मुळात अशी मागणीही करावी लागण्याची आवश्यकता नाही. केंद्रातील सरकारनेच असा निर्णय घेतला पाहिजे होता, असे हिंदूंना वाटते !

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्या पंढरपूर दौर्‍यात कोरोनाविषयक नियम डावलून मोठ्या संख्येने समर्थकांची गर्दी !

कोरोना नियमांचे पालन न झाल्याने शहर पोलिसांनी आयोजकांवर कोरोनाविषयक नियम तोडल्याचा गुन्हा नोंद केला. ही पोटनिवडणूक १३ एप्रिल या दिवशी होत असून २३ मार्चपासून उमेदवारी आवेदन दाखल होण्यास प्रारंभ होत आहे.

स्वरक्षणासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती या तिन्हींचा संगम हवा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

कित्येक महिलांवर प्रतिदिन अन्याय, अत्याचार होत आहेत. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्यामध्ये शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक बळ हवे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही या वेळी केले.     

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथे ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनाचे निमित्त !

कोल्हापुरात दळणवळण बंदी नाही; मात्र कोरोनाचा संसर्ग न वाढण्यासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी ! – सतेज पाटील, पालकमंत्री

दळणवळण बंदी कोणत्याही घटकाला परवडणारे नसल्याने कोल्हापुरात दळवळण बंदी करण्यात येणार नाही; मात्र कोरोनाचा संसर्ग न वाढण्यासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी. ‘नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची प्रभावी कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

वाढे फाटा परिसरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ !

वाढे फाटा ते वेण्णा नदी पूल या अंतरामध्ये लुटमारीच्या घटना वाढत आहेत. १९ मार्चच्या रात्री संतोष उबाळे यांना ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी अडवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडून भ्रमणभाष, रोख रक्कम आणि पॅन्ट काढून घेतली.

पाचगणी (जिल्हा सातारा) येथे रुग्णवाहिकेची ४ वाहनांना जोरदार धडक 

रत्नागिरी येथील एका कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतदेह घेऊन ही रुग्णवाहिका पाचगणी येथे येत होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील वाहनतळावर लावलेल्या गाड्यांना रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली

होळीच्या वेळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची ‘आदर्श होलिकोत्सव साजरा करा !’ मोहीम

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पेणच्या माध्यमातून धर्मवीर बलीदान मासानिमित्त प्रतिदिन श्रीशिव-शंभू मानवंदना उपक्रम !

मानवंदना ११ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत नियमितपणे देण्यात येणार आहे. पुढे पौर्णिमा आणि अमावास्या या दोन तिथींना असाच क्रम चालू असणार आहे, असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.