मुंबई – मागील २ आठवड्यांत कोरोनामुळे राज्यातील २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य पोलीस मुख्यालयातून देण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या पोलिसांमध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचाही समावेश आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत ३९० पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मागील वर्षभरात राज्य पोलीस दलातील ३४ सहस्र ५८७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये मुंबईतील ८ सहस्र ३७२ पोलिसांचा समावेश आहे. सध्या ३ सहस्र ७०० पोलिसांवर उपचार चालू आहेत.