कितीही उच्चशिक्षण घेतले, तरी मनोबल, आत्मबळ नसेल, तर जीवनातील आनंद कसा घेता येईल ? आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याने लोकांना आधुनिक शिक्षण घेऊनही जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोनच मिळाला नाही. त्यामुळे ते अशा संकटात खचून जातात आणि टोकाचे पाऊल उचलतात !
नवी देहली – उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील सूरजपूर स्थानक परिसरात कोरोना संसर्ग झाल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या एका महिला डॉक्टरने इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली.